Amitabh Bachchan gets the amount of money to shoot a part of Karun Banega Crorepati ... | ​कौन बनेगा करोडपतीच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांना मिळते इतकी रक्कम... आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

​कौन बनेगा करोडपतीच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांना मिळते इतकी रक्कम... आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगणार आहे... कौन बनेगा करोडपती हा प्रश्न उत्तरांचा रंगमंच असून रसिकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचे दहावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमचे आजवरचे सगळे सिझन लोकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाने बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांना छोट्या पडद्यावर देखील एक वेगळी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनचे सूत्रसंचालन देखील अमिताभ बच्चन हेच करणार आहेत. अमिताभ बच्चन यांना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी केवळ एका भागाचे किती मानधन मिळते हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आठव्या सिझनपर्यंत अमिताभ बच्चन यांना प्रत्येक भागाचे दोन करोड रुपये दिले जात असल्याचे म्हटले जाते. पण गेल्या सिझनपासून त्यांना एका भागासाठी पावणे तीन ते तीन करोड रुपये इतके मानधन मिळते अशी चर्चा आहे आणि आता तर दहाव्या सिझनला त्यांच्या मानधनात आणखी वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा अमिताभ बच्चन हे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याशिवाय या कार्यक्रमाचा प्रेक्षक विचार देखील करू शकत नाहीत. या कार्यक्रमाच्या काही सिझनचे सूत्रसंचालन शाहरुख खानने देखील केले होते. पण प्रेक्षकांनी बॉलिवूडच्या बादशहापेक्षा शहेनशहाला अधिक पसंती दिली. 
अमिताभ बच्चन यांनी रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द आता पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

Also Read : तुम्ही अशाप्रकारे करू शकता कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनचे रजिस्ट्रेशन...

Web Title: Amitabh Bachchan gets the amount of money to shoot a part of Karun Banega Crorepati ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.