Aladdin has killed the King of Baghdad in Aladdin: Naam Toh Suna Hoga | 'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार
'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मधील अलाद्दिन आगामी एपिसोड्समध्‍ये शीतयुद्धांच्‍या सिरीजसह प्रेक्षकांना अचंबित करणार आहे. अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) त्‍याचे कुटुंब व बगदादचा विध्‍वंस करणा-या मुछडचा शोध घेऊन त्‍याला शिक्षा देण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. अखेर त्‍याला मुछडची खरी ओळख समजते. जिनूची सुटका करण्‍यासाठी एका रहस्‍यमय खोलीमध्‍ये प्रवेश करत असताना अलाद्दिनला राजाला मुछडच्‍या वेशात पाहतो. दुसरीकडे जफरने (आमीर दळवी) मनात द्वेष धरत राजाला बगदादचा कालाचोर म्‍हणून अलाद्दिनचे नाव सांगितलेले असते. 

यास्‍मीनला तिच्‍या वडिलांचे खरे रूप सांगण्‍यामध्‍ये असमर्थ ठरलेला अलाद्दिन संपूर्ण दरबारासमोर राजावर त्‍याचे कुटुंब व राज्‍याचा विध्‍वंस करण्‍याचा आरोप करतो. राजा देखील ते मान्‍य करतो. अलाद्दिन व राजा यांच्‍यामध्‍ये चाललेल्‍या भांडणादरम्‍यान अलाद्दिन दिव्‍याच्‍या जिनीने (ऊर्फ जिनू) निर्माण केलेल्‍या मोहजालामध्‍ये अडकून जातो आणि आपल्‍या तलवारीने राजावर हल्‍ला करतो.

सोनी सबवरील काल्‍पनिक कथा 'अलाद्दिन – नाम तो सुना होगा' लक्षवेधक पटकथांसाठी ओळखली जाते. ही मालिका अनेक घटनांसह कथेमध्‍ये धक्‍कादायक वळण घेऊन येत आहे. आता प्रश्‍न निर्माण झाला आहे की, अलाद्दिनने खरंच राजाला ठार केले आहे का? आणि जिनू या सगळ्यामध्‍ये का सामील झाला आहे? 

अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्‍हणाला, ''कथेला मोठे वळण मिळत आहे. मोठ्या धक्‍कादायक घटना समोर येत आहेत. अलाद्दिनसाठी हा सर्वात अवघड क्षण आहे. त्‍याला त्‍याच्‍या कुटुंबाचा विध्‍वंस करण्‍यासाठी जबाबदार असलेल्‍या व्‍यक्‍तीबाबत समजले आहे. स्थिती खूपच तणावग्रस्‍त आहे. आमच्‍या प्रेक्षकांना आगामी एपिसोड्समधील धक्‍कादायक गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी खंबीर व्‍हावे लागेल. प्रेक्षकांनी आतापर्यंत सतत दिलेला पाठिंबा व प्रेमासाठी मी त्‍यांचे आभार मानतो. या मालिकेसह आम्‍ही तुमचे सतत मनोरंजन करण्‍याचा प्रयत्‍न करु.''

 


Web Title: Aladdin has killed the King of Baghdad in Aladdin: Naam Toh Suna Hoga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.