छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अक्षया देवधर  घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आपल्या भूमिकेमुळे तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. अक्षयाने  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते.

मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा साडीतील अंदाज चाहत्यांच्या सर्वाधिक पसंतीस पात्र ठरतो. रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या याच सोज्वळ लूकची झलक बघायला मिळते.

अक्षया सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत अक्षयाने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे. विविध स्टाईलमधील अक्षयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.  या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

साडीमध्ये तिचे सौदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. अक्षयाच्या या प्रत्येक फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर  शेअर केले आहेत.या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.  चेह-यावरही वेगळेच भाव उमटल्याचे  पाहायला मिळतायत. सध्या अक्षया देवधरचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. 

काही फोटोमध्ये अक्षयाचा निरागसपणा दिसून येत आहे. तर काही फोटोंमध्ये अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात. मात्र आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshaya Deodhar New Saree Photos Catches Everyone Eyeball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.