मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:50 PM2021-03-18T12:50:06+5:302021-03-18T12:52:52+5:30

नवी मालिका...नवा लुक ...! गिरीश ओक यांच्याशी अभिजीत राजेंच्या चमचमीत मेन्यूइतक्याच चमचमीत गप्पा

Aggabai Sunbai fame Abhijit Raje aka Girish Oak interview | मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले?

मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अग्गंबाई सासूबाई’चा नवा सीझन अर्थात ‘अग्गंबाई सुनबाई’ ही नवी मालिका गेल्या 15 मार्चपासून सुरु झालीये.

झी मराठी वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.  निवेदिता सराफ आणि गिरीश ओक या जोडीने तर सर्वांना वेड लावले. आता ही जोडी पुन्हा वेगळ्या रूपात, वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांपुढे आली आहे. होय, ‘अग्गंबाई सासूबाई’चा नवा सीझन अर्थात ‘अग्गंबाई सुनबाई’ ही नवी मालिका गेल्या 15 मार्चपासून सुरु झालीये. अशात अभिजीत राजे आणि आसावरीची चर्चा तर होणारच.
‘अग्गंबाई सुनबाई’च्या निमित्ताने अभिजीत राजे अर्थात गिरीश ओक यांनी लोकमतशी गप्पा मारल्या. या गप्पाही अभिजीत राजेंच्या चमचमीत मेन्यूइतक्याच चमचमीत खमंग. ‘अग्गंबाई सुनबाई’तील नवा लुक इथपासून तर अभिजीत राजे आणि गिरीश ओक यांच्यातील साम्य यावर ते बोलले.

60 वर्षाचा हिरो अन् 55 वर्षांची हिरोईन...
 ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि आत्ता ‘अग्गंबाई सुनबाई’ या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, मिळतोय याचा आनंद आहे. मुळात 60 वर्षांचा हिरो आणि 55 वर्षांची हिरोईन साकारणे एक चॅलेंज होते. मी आणि आसावरीने हे चॅलेंज अगदी यशस्वीपणे पेलले. अभिजीत राजेंची भूमिका माझ्याकडे चालून आली आणि मी ती लगेच स्वीकारली. जणू माझ्यासाठीच ही भूमिका लिहण्यात आली होती, असे मला वाटते, असे गिरीश ओक म्हणाले.

‘अग्गंबाई सुनबाई’ नवे लूक
 ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये मी डॅशिंग एन्ट्री घेतली होती. ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेतही मी डॅशिंग अवतारात आहे.  ‘अग्गंबाई सुनबाई’मध्ये माझा लुक बदललेला आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांना हा लुक आवडला याचा विशेष आनंद आहे.  ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘अग्गंबाई सुनबाई’ मधील अभिजीतचा लूक बदलला असला तरी  अभिजीत मात्र तोच आहे. बायकोवर, गाण्यावर, जेवणावर प्रेम करणारा, सगळ्यांना सांभाळणारा तोच अभिजीत राजे. फक्त त्याचा रोल बदललाय. आता त्याने तो पैशासाठी नाही तर घरच्यांच्या समाधानासाठी काम करतोय आणि हा बदल त्याने स्वत:हून स्वीकारलाय, असेही त्यांनी सांगितले.  ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये घरा बाहेरचा अभिजीत दिसला.  ‘अग्गंबाई सुनबाई’मध्ये घराच्या आतला अभिजीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता मी हाऊस हसबण्ड झालोय, असे ते म्हणाले.

काय आहे गिरीश ओक आणि अभिजीत राजेंमध्ये साम्य?
ख-या आयुष्यातही मी अगदी अभिजीत राजेंसारखाच आहे. अगदी गाण्यांवर प्रेम करणारा, जेवणावर प्रेम करणारा, गमतीजमती करणारा, बाईकवर प्रेम करणारा. फरक एवढाच की, खºया आयुष्यात मी डॉक्टर आहे आणि मालिकेतला अभिजीत राजे शेफ आहे. 


 

Web Title: Aggabai Sunbai fame Abhijit Raje aka Girish Oak interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.