Aggabai Saasubai latest episode Abhjeet and Asawari not meet each other | 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी व अभिजीत राजेंची होणार चुकामुक?
'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी व अभिजीत राजेंची होणार चुकामुक?

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. अभिजित राजे आणि आसावरी यांच्यातील मैत्रीच नातं दिवसेंदिवस दृढ होतंय आणि त्यात आता सोहमला अभिजीत राजेंना आसावरी आवडत असल्याचं समजलं आहे. 


नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात सोहमला अभिजीत राजेंचे आसावरीवर प्रेम असल्याचे समजते आणि त्याला ते अजिबात आवडत नसते. त्यामुळे अभिजीत राजे व आसावरी मंदिरात भेटणार असल्याचे सोहम चोरून ऐकतो आणि त्यांची भेट होऊ न द्यायचे ठरवितो. इतकेच नाही तर तो आसावरीचा फोनदेखील पाण्यात टाकून बिघडवतो. आजोबांना सांगून आसावरीला गावाला जाण्याचे प्लानिंग सोहम आखतो. मात्र आजोबा सोहमलाही तिच्यासोबत जायला सांगतो. तिथे सकाळी देवळात अभिजीत राजे आसावरीची वाट पाहत असतात. आसावरी राजेंना भेटायचे सोहमला सांगते. त्यावर सोहम जाताना भेटूयात असं म्हणतो. गावाला जायला निघाल्यावर रस्त्यात मंदिराजवळ रिक्षा थांबवून आसावरी देवळात जाऊन येते सांगते. मात्र सोहम जाऊ देत नाही. देवळात अभिजीत राजे बऱ्याच वेळापासून आसावरीची वाट पाहत असतात.


पुढील भागात, सोहम गावच्या बसमध्ये बसतो आणि आसावरीला सांगतो की ऑफिसच्या कामामुळे मला गावी जाता येणार नाही.तर तू एकटी जा. त्यात सोहम आसावरीला चुकीच्या बसमध्ये बसवतो. आसावरीला समजते तेव्हा तिचा गोंधळ उडतो. तर अभिजीत राजे आसावरीची वाट पाहून निघतात. त्यावेळी बसच्या बाजूला अभिजीत राजेंची गाडी सिग्नलला थांबते. त्यावेळी चुकीच्या बसमुळे कावरी बावरी झालेली आसावरी कंडक्टरला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात लोक अभिजीत राजे म्हणून ओरडू लागतात.

त्यावेळी आसावरी व अभिजीत राजेंची एकमेकांशी भेट होणार की नाही, हे आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Web Title: Aggabai Saasubai latest episode Abhjeet and Asawari not meet each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.