Agga Bai Sasubai Serial: Abhijit Aswari's grandson in Rajasthan's pink cold, watch video
अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेच्या कथेतील नाविन्य, मालिकेची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. मालिका आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे.
अभिजित व आसावरीचे १९ जानेवारीला मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अभिजितच्या घरी गोंधळ वगैरे पार पडतो. भलेही आसावरी लग्न करून अभिजितच्या घरी आली असली तरी तिचे सगळं लक्ष आजोबा, सोहम व शुभ्रा यांच्याकडे लागून राहिलेलं असतं. लग्न जरी पार पडलं असलं तरी सोहमला अजिबात पटलेलं नाही. त्यामुळे तो त्यांना कसे वेगळे करता येईल, याची योजना आखत असतो.
तर दुसरीकडे लग्न झाल्यानंतर शुभ्रा अभिजित व आसावरी यांच्यासाठी राजस्थानचे टूर पॅकेज बुक करून त्यांना गिफ्ट करते आणि ते आता सध्या राजस्थानमध्ये एकमेकांसोबत वेळ व्यतित करत आहेत. ही टूर अविस्मरणीय बनवण्यासाठी अभिजित राजे खूप प्रयत्न करत आहेत. ते आसावरीसाठी स्पेशल डिनर डेट प्लान करतात आणि हा प्लान आसावरीलाही आवडतो.
नुकताच झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राजस्थानमधील आसावरी व अभिजितचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून म्हटलं की, राजस्थानच्या गुलाबी थंडीत बहरतंय अभिजित आसावरीचं नातं
या व्हिडिओत अभिजित व आसावरी उंटावरून राजस्थानमध्ये फिरताना दिसत आहेत.
नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात सोहमदेखील शुभ्रासोबत राजस्थानला जाण्याची योजना आखतो. त्यामुळे आगामी भागात काय घडणार आहे, हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.
Web Title: Agga Bai Sasubai Serial: Abhijit Aswari's grandson in Rajasthan's pink cold, watch video