जाणून घ्या अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर काय करतोय बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:37 AM2021-03-18T11:37:32+5:302021-03-18T11:39:34+5:30

अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर आता बबड्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. प्रेक्षकांचा लाडका बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की ही मालिका संपल्यानंतर काय करतोय हे त्यानेच आता सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

agga bai sasubai babdya aka ashutosh patki shares workout picture on social media | जाणून घ्या अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर काय करतोय बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की

जाणून घ्या अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर काय करतोय बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की

googlenewsNext
ठळक मुद्देआशुतोषने डम्बल्स उचलतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत कामाचे नियोजन करा... त्या नियोजनाप्रमाणे काम करा असे कॅप्शन लिहिले आहे.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेतील बबड्या ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेत ही व्यक्तिरेखा आशुतोष पत्कीने साकारली होती. 

अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर आता बबड्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. प्रेक्षकांचा लाडका बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की ही मालिका संपल्यानंतर काय करतोय हे त्यानेच आता सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. आशुतोषने डम्बल्स उचलतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत कामाचे नियोजन करा... त्या नियोजनाप्रमाणे काम करा असे कॅप्शन लिहिले आहे. आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आम्ही तुला मिस करतो असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याने वन्स मोअर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. अभिनय हे आशुतोषचे पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत त्याने काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली. 

Web Title: agga bai sasubai babdya aka ashutosh patki shares workout picture on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.