After two years, Karan Mehra made Comeback on small screens | तब्बल दोन वर्षानंतर करण मेहरा करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
तब्बल दोन वर्षानंतर करण मेहरा करणार छोट्या पडद्यावर कमबॅक


स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है!' या लोकप्रिय मलिकेत नैतिकची भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा हा आता या वाहिनीवरील दीप्ती कलवाणी यांच्या ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेतील एका भूमिकेद्वारे तब्बल दोन वर्षांनी टीव्हीच्या पडद्यावर परतणार आहे. या मालिकेत करण मेहरा हा श्रेणू आणि टिना परिखच्या वडिलांची
भूमिका रंगविणार आहे.


करण मेहरा म्हणाला, “या मालिकेच्या कथानकाला पूर्वेतिहास असून मी फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. मला महिन्यातून दोन दिवस चित्रीकरण करावे लागणार असून मला ही योजना पसंत आहे. महिन्यातून केवळ दोन दिवस उपलब्ध करून देणे मला सहज शक्य आहे.”


केवळ सकारात्मक भूमिकांपुरतेच आपल्याला मर्यादित राहायचे नाही, असे त्याने सांगितले. करण म्हणाला, “मी अभिनय एक छंद म्हणून करतो. तो करण्याची माझ्यावर कोणी जबरदस्ती करीत नाही. मला आता एक खलनायकी भूमिका साकारायची असून ती रंगविताना मला नक्कीच मजा येईल. अभिनयाच्या नव्या वाटा मला शोधायच्या आहेत. आता दिवस बदलले असून आता एखाद्या नटावर खलनायकाचा किंवा नायकाचा शिक्का बसत नाही. म्हणूनच कोणत्याही कलाकारासाठी सध्या अभिनयाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.”


तब्बल दोन वर्षांनी करण मेहराला पुन्हा एकदा टीव्हीच्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


Web Title: After two years, Karan Mehra made Comeback on small screens
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.