कोरोनाचे सर्व नियम पाळूनही दोघेही कोरोना पॉझीटीव्ह, Aditya Narayan आणि पत्नी Shweta Agarwal झाले होम क्वॉरंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 10:27 AM2021-04-04T10:27:06+5:302021-04-04T10:31:06+5:30

Aditya Narayan, wife Shweta test Covid positive: आदिल्य नारायण इंडिय आयडल शोला होस्ट करत होता. तब्येत बरी नसल्यामुळे त्याने हा शो सोडला आहे.

Aditya Narayan, wife Shweta test Covid positive, | कोरोनाचे सर्व नियम पाळूनही दोघेही कोरोना पॉझीटीव्ह, Aditya Narayan आणि पत्नी Shweta Agarwal झाले होम क्वॉरंटाईन

कोरोनाचे सर्व नियम पाळूनही दोघेही कोरोना पॉझीटीव्ह, Aditya Narayan आणि पत्नी Shweta Agarwal झाले होम क्वॉरंटाईन

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची संख्या अधिक आहे.गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन आणि अक्षय कुमार. कोरोनाग्रस्त कलाकारांची संख्या वाढतच चालली आहे. बॉलिवूडप्रमाणे टीव्ही कलाकारांनाही शूटिंग दरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे बातम्या रोज येत आहेत. आता यात गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेतालाही कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आदित्यनेच कोरोन पॉझीटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दिली आहे.


सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या  आदित्यने त्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत  लिहीले की,पत्नी श्वेता आणि माझी चाचणी पॉझिटीव्ह आली असून दोघेही सध्या उपचार घेत आहोत. आम्ही सध्यातरी घरीच क्वारंटाइन आहोत. दोघेही स्वतःची सर्व काळजी घेत आहे आणि सर्व नियमांचं पालन करत आहोत. आम्ही लवकरच यातून बरे होवू, आमच्यासाठी प्रार्थना करा. 


आदिल्य नारायण इंडिय आयडल शोला होस्ट करत होता. तब्येत बरी नसल्यामुळे त्याने हा शो सोडला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची तब्येत बरी नाहीय.त्यात शूटिंग करण्यासाठी तो इतका फिट नव्हता.अशक्तपणा मुळे त्याला जास्त काम करणे शक्य नाही. आराम करता यावा म्हणून त्याने शो सोडला आहे.

 

आदित्यच्या जागी जय भानुशाली या शो होस्ट करणार आहे. त्यामुळे जय भानुशालीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असणार. आदित्य नारायण अलीकडेचं लग्नाच्या बेडीत अडकला आहे. १ डिसेंबरला आदित्यने त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कोरोनामुळे आदित्यच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळचे नातेवाईक असे 50 पाहुणेचं उपस्थित होते.

Web Title: Aditya Narayan, wife Shweta test Covid positive,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.