आदित्य नारायणची पत्नी श्वेताने हनीमूनला चावला त्याचा कान, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:57 PM2021-02-19T16:57:51+5:302021-02-19T17:04:58+5:30

Aditya Narayan's wife Shweta Agarwal romantic honeymoon video : आदित्य नारायणने त्याच्या हनीमूनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Aditya narayan wife shweta agarwal bites husband ear video gone viral | आदित्य नारायणची पत्नी श्वेताने हनीमूनला चावला त्याचा कान, व्हिडीओ व्हायरल

आदित्य नारायणची पत्नी श्वेताने हनीमूनला चावला त्याचा कान, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने  गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री श्वेता अग्रवालशी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले.  या दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडते. आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो चाहत्यांना पसंत पडला आहे.  व्हिडिओ त्यांच्या हनीमूनचा आहे ज्यात श्वेता अग्रवाल आदित्य नारायणच्या कानाचा चावा घेताना दिसतेय. 

आदित्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते
 आदित्य नारायणने 1 डिसेंबरला आपली जुनी मैत्रीण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवालशी लग्न केले.  दोघांच्या लग्नाची खूप चर्चा होती.  त्यांच्या लग्नात कुटुंबाखेरीज इंडस्ट्रीतील काही मोजक्या खास लोकांनीच हजेरी लावली.  त्याचबरोबर लग्नानंतर या दोघांची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.  लग्नानंतर हे कपल हनीमून साजरा करण्यासाठी काश्मीरला गेले.

क्युट व्हिडिओ व्हायरल झाला
 आदित्य नारायणने नुकताच त्याच्या हनीमूनचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालचा सेल्फी व्हिडिओ आहे. श्वेता अग्रवाल आधी  आदित्यच्या गालावर किस करते  आणि नंतर अचानक त्याच्या कानात चावा घेते. आदित्य हे पाहून शॉक होतो आणि श्वेता थोडी लाजते.
 

Web Title: Aditya narayan wife shweta agarwal bites husband ear video gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.