Aditya Narayan Shweta Aggarwal cute video went viral on internet | VIDEO : लग्नाच्या दोन दिवसानंतर आदित्यने पत्नीला दिली 'धमकी', म्हणाला - '...तर माहेरी परत जावं लागेल'

VIDEO : लग्नाच्या दोन दिवसानंतर आदित्यने पत्नीला दिली 'धमकी', म्हणाला - '...तर माहेरी परत जावं लागेल'

बॉलिवूड अभिनेता आणि  गायक आदित्य नारायण त्याची गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत विवाह बंधनात अडकला. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोघेही लग्नाचा एक रिवाज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आदित्यच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.

आदित्यने श्वेताला दिली 'धमकी'

व्हायरल व्हिडीओत श्वेता अग्रवाल सासू म्हणजे दीपा नारायणसोबत जेवण तयार करताना दिसत आहे. एकीकडे श्वेता सासूसोबत किचनमध्ये काहीतरी तयार करत आहे तर दुसरीकडे आदित्य नारायण श्वेताला गमतीने 'धमकी' देताना दिसतो आहे. तो म्हणतो की, टेस्टमध्ये काहीच कमतरता रहायला नको. तसं झालं नाही तर आपल्या माहेरी जा. व्हिडीओत आदित्य नारायणसोबतच परिवारातील लोकही हसताना दिसत आहेत.

व्हिडीओत आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. आदित्य आणि श्वेताचं भेट हॉरर सिनेमा 'शापित'च्या सेटवर झाली होती. दोघेही यात मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर दोघेही १२ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya Narayan Shweta Aggarwal cute video went viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.