Actresses Kavita Kaushik Post Pics in Hot Yoga Poses, You Will Be Amazed To Seeing This | या अभिनेत्रीने फिटनेस फ्रिक फोटो केले शेअर

या अभिनेत्रीने फिटनेस फ्रिक फोटो केले शेअर

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक सध्या तिच्या कामापेक्षा फिटनेसमुळेच अधिक चर्चेत आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती  सा-यांचे लक्ष वेधून घेत असून  तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. कविताने वयाची पस्तीशी ओलांडली असली सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. हे फोटो पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाजा बांधणे अशक्यच.  


सध्या ती अभिनयात फारशी सक्रीय नसली तरी वर्कआऊट आणि इतर गोष्टी करण्यात वेळ देत असते. फिटनसे फ्रिक अभिनेत्रीच्या यादीत लवकरच कविताचे नाव सामिल होणार यांत काही शंकात नाही. तसेच सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे कविता कौशिकचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या फिटनेस फ्रिक बनलेली कविता कौशिक तिचे योगा करत असल्याचे व्हिडीओ फोटो आणि इतरांनाही टीप्स देत प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते.  


कविता आणि रोनित यांच्यात चांगली केमिस्ट्री असल्यामुळे तिने लग्न करत आयुष्याशी नवीन सुरूवात केली आहे. लग्नानंतर सारेच तिला तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारत होते, अखेर मौन सोडत तिने म्हटले की,  कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते.मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते.

Web Title: Actresses Kavita Kaushik Post Pics in Hot Yoga Poses, You Will Be Amazed To Seeing This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.