मालिकेत कामासाठी या अभिनेत्रीला नग्न होण्याची ऑफर, #MeTooअंतर्गत मांडली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:29 PM2018-10-26T12:29:34+5:302018-10-26T12:31:13+5:30

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचार आणि अन्यायाला सोशल मीडियावर वाचा फोडली आहे.

Actress Sonal Vengurlekar has been told to get nude for work in serial,Shares Metoo Experience | मालिकेत कामासाठी या अभिनेत्रीला नग्न होण्याची ऑफर, #MeTooअंतर्गत मांडली आपबिती

मालिकेत कामासाठी या अभिनेत्रीला नग्न होण्याची ऑफर, #MeTooअंतर्गत मांडली आपबिती

googlenewsNext

सध्या सर्वत्र #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक अभिनेत्री, मॉडेल्स त्यांच्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडत आहेत. नाना पाटेकर, आलोकनाथ, साजिद खान, विकास बहेल, अनु मलिक यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. आता हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसोबतच मराठी अभिनेत्रीही पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडत आहेत. नुकतंच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचार आणि अन्यायाला सोशल मीडियावर वाचा फोडली आहे. सोनल वेंगुर्लेकर असं या अभिनेत्रीचे नाव आहे.

मालिकांमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी सोनल मूळची मुंबईची. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली. याच दरम्यान एका मालिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी सोनल गेली. मात्र यावेळी तिची निवड झाली नाही. त्यावेळी अवघ्या १९ वर्षाची असणाऱ्या सोनलला राजा बजाज यांनी खोलीत बोलावून घेतलं. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या बजाज यांनी एक ऑफर दिल्याची कटू आठवण सोनलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

“अभिनय येत नसला तरी तू दिसायला सुंदर आहेस. त्यामुळे तुझी काम करायची इच्छा असेन तर काम द्यायला तयार आहे फक्त तू नग्न होऊन माझ्यासमोर ये” असं बजाजनं सांगितल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलं. ते इतक्यावरच थांबले नाही तर तुला तांत्रिक विद्या शिकवेन असं सांगत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने नमूद केले आहे. यामुळे भेदरलेल्या सोनलने आरडाओरडा करत पळ काढला. त्यावेळी ऑडिशनसाठी आलेली एक मॉडेल आणि तिच्या आईने साथ दिल्याचे तिने सांगितलं. त्यांना सोबत घेऊन पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी लेखी जबाब घेतला. मात्र याप्रकरणी पोलिसांनी भलतीच केस दाखल करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली असा आरोप सोनलने पोस्टमधून केला आहे. त्यामुळे आजही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप तिने केला आहे. सोनलने दिल दोस्ती डान्स, शास्त्री सिस्टर्स, ये वादा रहा आणि शास्त्री सिस्टर्स अश्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Actress Sonal Vengurlekar has been told to get nude for work in serial,Shares Metoo Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.