अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे कोरोनामुळे झाले निधन, म्हणाली- 'सगळ्यात मोठा आधारस्तंभ गमावला'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 04:46 PM2021-05-01T16:46:27+5:302021-05-01T16:46:42+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या वडिलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

Actress Sneha Wagh's father dies due to corona, says 'lost the biggest pillar' | अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे कोरोनामुळे झाले निधन, म्हणाली- 'सगळ्यात मोठा आधारस्तंभ गमावला'

अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे कोरोनामुळे झाले निधन, म्हणाली- 'सगळ्यात मोठा आधारस्तंभ गमावला'

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या वडिलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्नेहा वाघने इन्स्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर २७ एप्रिल २०२१ रोजी वडिलांचे निधन झाल्याचे लिहिले आहे.  यासोबत तिने लिहिले की, ‘न्यूमोनिया आणि कोरोना या आजारांशी महिनाभर सामना केल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. माझा सगळ्यात मोठा आधारस्तंभच मी गमावला आहे. या प्रकारच्या वेदना यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या. आपण कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत याचा फरक पडत नाही. पण आपल्या पालकांना गमावल्यावर प्रचंड वेदना होतात.


याशिवाय तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की, प्रिय पप्पा, तुम्ही तुमच्या शब्दांनी खूप लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवत होतात कारण त्यांचा दिवस चांगला जावा. तुम्ही चांगले खंबीर आणि मनमिळाऊ व्यक्ती होतात. तुम्ही आम्हाला कॉन्फिडंट आणि स्ट्राँग बनवले. तुम्ही आम्हाला आमची किंमत आणि स्वप्न पूर्ण करायला शिकवलात. तुम्ही नेहमीच प्रामाणिक रहायला सांगितले होते आणि चांगले व्यक्ती बनायला सांगितले होते. आमच्यासाठी तुम्ही नेहमीच हिरो आहात. हे ऐकून कोलमडून जायला होते की आता आम्हाला या एकटे रहावे लागणार. तुमच्याशिवाय एकटेपणा आला आहे. आम्ही तुम्हाला शेवटचा निरोपदेखील देऊ शकलो नाही. आम्ही काहीच करू शकलो नाही. आता लाइफ पहिल्यासारखे कधीच राहणार नाही.


स्नेहाने ‘ज्योती’, ‘वीरा’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Actress Sneha Wagh's father dies due to corona, says 'lost the biggest pillar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.