लॉकडाउननंतर पानिपतहून मुंबईत परतली अभिनेत्री, पण सोसायटी देत नव्हती Entry

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:42 AM2020-06-12T11:42:07+5:302020-06-12T11:43:08+5:30

आधी या अभिनेत्रीला सोसायटी घेण्यास रोखले मात्र बऱ्याच वादानंतर त्यांनी या अटीवर त्यांना घरी जाण्यास प्रवेश दिला.

The actress returned to Mumbai from Panipat after the lockdown, but the society gave her no entry | लॉकडाउननंतर पानिपतहून मुंबईत परतली अभिनेत्री, पण सोसायटी देत नव्हती Entry

लॉकडाउननंतर पानिपतहून मुंबईत परतली अभिनेत्री, पण सोसायटी देत नव्हती Entry

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवले आहे. त्यात देशातही कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपट, मालिकांचे तीन महिन्यांपासून शूटिंगही बंद होते. अशात बरेच कलाकार आपापल्या घरी गेले होते. मात्र आता शूटिंग सुरू होणार असल्यामुळे हे कलाकार मुंबईत परतत आहे. मात्र मुंबईत परतल्यानंतर आता या कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' या मालिकेची मुख्य अभिनेत्री कनिका मान ही मुळची पानिपत इथली असून तीदेखील लॉकडाउनमध्ये तिच्या घरी गेली होती. ती मुंबईत भाड्याने राहत आहे. शूटिंगला सुरुवात झाल्यामुळे ती मुंबईत परतली. पण सोसायटीतील कडक निर्बंधांमुळे अ़डचणीचा सामना करावा लागला. सुरुवातीला सोसायटीने या अभिनेत्रीला बिल्डिंगमध्येच घेण्यास नकार दिल्याने ती थोडी टेन्शनमध्ये आली.


कनिका मान ही लॉकडाउननंतर तिच्या घरी पानिपतला गेली होती. तिथे तीन महिने राहिल्यानंतर ती परत आली. येताना ती तिच्या आईला सोबत घेऊन आली. मात्र त्यानंतर जेव्हा ती तिच्या भाड्याच्या घरात परतली तेव्हा त्यांना सोसायटीकडून रोखण्यात आले. त्यानंतर सोसायटीने तिला प्रवेश दिला मात्र तिच्या आईला घेण्यास नकार दिला.

यावरून सोसायटी व अभिनेत्रीमध्ये वाद झाला. मग त्या दोघींनाही पंधरा दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या अटीवर सोसायटीत घेण्यात आले.

Web Title: The actress returned to Mumbai from Panipat after the lockdown, but the society gave her no entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.