प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. रसिकांकडून प्राजक्ताच्या या फोटोंना बरेच लाइक्सही मिळाले होते. प्राजक्ताचा सेन्सेशन्ल बोल्ड अंदाज रसिकांसमोर आला होता. तेव्हाही सोशल मीडियावर तिच्या फोटोची चर्चा रंगली होती.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress prajakta mali new photoshoot went vrail on intrnet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.