शुभमंगल सावधान ! अभिनेता विराफ पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना अडकले लग्नबेडीत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:33 PM2021-05-07T15:33:53+5:302021-05-07T15:35:10+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केले आहे.

Actor Viraf Patel and actress Saloni Khanna are stuck in a wedding bed | शुभमंगल सावधान ! अभिनेता विराफ पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना अडकले लग्नबेडीत, फोटो आले समोर

शुभमंगल सावधान ! अभिनेता विराफ पटेल आणि अभिनेत्री सलोनी खन्ना अडकले लग्नबेडीत, फोटो आले समोर

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विराफ आणि सलोनीने मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न केले आहे. एक बूंद इश्क आणि नामकरण मालिकेतील अभिनेता विराफ पटेलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सलोनीसोबत साखरपुडा केला होता. दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन शोदरम्यान झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करू लागले होते.


विराफ पटेलने एका मुलाखतीत सांगितले की, या लग्नात त्यांचे कुटुंब झूम मीटिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. बऱ्याच काळापासून आम्हाला लग्न करायचे होते, पण सध्याचा काळ पाहून आम्ही कोर्ट मॅरिज करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हेच केले जाऊ शकत होते.


त्याने पुढे सांगितले की, लग्न करण्याचा उद्देश हाच होता की आम्हाला जीवनात एकत्र पुढे जायचे आहे. आशा आहे की आमचे लग्न यशस्वी होईल आणि आमच्या जीवनात खूप आनंदी राहू. विराफच्या विवाहातील हटके गोष्ट ही होती की अंगठीच्या जागी रबर बँड घालावी लागली.


अभिनेता विराफ म्हणाला की, आता कोरोनाचे संकट आले आहे. सर्वकाही बंद आहे. अशात आम्ही जुगाड शोधला. सर्वात चांगली बाब ही आहे की सलोनीने यासाठी मला मारले नाही. लग्नाचे वृत्त आल्यापासून दोघेही चर्चेत आहे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलोनी खन्ना पंजाबी आहे आणि विराफ पटेल पारसी आहे. 

Web Title: Actor Viraf Patel and actress Saloni Khanna are stuck in a wedding bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.