'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:40 PM2021-05-11T22:40:31+5:302021-05-11T22:41:06+5:30

शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली.

The actor in the series 'Mulgi Jhali Ho' was robbed on the Mumbai-Pune Expressway | 'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लुटले

'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लुटले

googlenewsNext

मुलगी झाली हो मालिकेत शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांकडून ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. 

 योगेश सोहनी आपल्या फोर व्हिलरने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिट जवळ ही घटना घडली होती. एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका ड्रायव्हरने योगेशला गाडी थांबवण्याचा इशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरने योगेशला जाब विचारत ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे’ असे म्हटले. त्यामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तुझ्यावर कायदेशीर तक्रार होऊ शकते जर असे नसेल करायचे तर एक लाख पंचवीस हजार रुपये दे . आम्ही तुझ्याविरुद्ध कुठलीही तक्रार करणार नाही असे म्हणून योगेशकडे भरभक्कम पैशाची मागणी केली.

या घटनेमुळे योगेश पुरता घाबरला दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने दमदाटी शिवीगाळ करून तिथल्याच एटीएममधून योगेशच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हातात पैसे मिळताच तो व्यक्ती ताबडतोब तिथून निघून गेला.


काहीतरी चुकीचे घडले असे वाटले म्हणून या सर्व घटनेचा संशय येताच योगेशने तात्काळ अपघात झालेल्या घटनांची माहिती घेतली मात्र दरम्यान यात कुठेही अपघात झाला नसल्याची माहिती त्याला नव्याने उलगडली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्याने सोमवारी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या अज्ञात व्यक्तिविरोधात त्याने रीतसर तक्रारही नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Web Title: The actor in the series 'Mulgi Jhali Ho' was robbed on the Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.