'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

By तेजल गावडे | Published: October 13, 2020 06:15 PM2020-10-13T18:15:07+5:302020-10-13T18:15:39+5:30

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे.

Abhijna Bhave's entry will be in the series 'Rang Mazha Vegla' | 'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. 

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. त्यासाठी नाशिका दीपा व कार्तिक जातात. पण तिकडे कार्तिक एका मोठ्या संकटात सापडतो. सौंदर्याला समजल्यावर तीदेखील नाशिकला रवाना होते. या संकटातून दीपा-कार्तिक बाहेर पडतील का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

दरम्यान आता मालिकेत कार्तिकची मैत्रीण तनुजा भारद्वाजची एन्ट्री होणार आहे. कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखिल उत्सुकतेचं असणार आहे. अशातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील. त्यासाठी पाहा ‘रंग माझा वेगळा’ दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिज्ञा भावेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं कर फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. २०१० साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

शेवटची ती तुला पाहते रे मालिकेत मायराच्या भूमिकेत झळकली होती. या भूमिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली होती.

Web Title: Abhijna Bhave's entry will be in the series 'Rang Mazha Vegla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.