Abhijit kelkar request to bigg boss for remove him from room | बिग बॉस मराठी २ : घरातील हा सदस्य जीवाच्या आकांताने सांगतोय, मला बाहेर काढा
बिग बॉस मराठी २ : घरातील हा सदस्य जीवाच्या आकांताने सांगतोय, मला बाहेर काढा

बिग बॉस मराठीच्या घरातील स्टोर रूममधून हा सदस्य अचानकच गायब झाला आणि सदस्यांना तो नक्की कुठे गेला आहे हे समजत नव्हते. काही सदस्यांना वाटले कि हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरामध्ये मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरु झाला होता. आज अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा आवाज “मला बाहेर काढा” हा आवाज आल्यावर सगळ्यांच भीती वाटली. शिव, विणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर आले. अभिजीत मला बाहेर काढा इतकच म्हणत होता. त्यामुळे शिव आणि विणाबरोबर इतर सदस्यांची घाबरगुंडी उडाली.

रुपालीकडे वैशाली आणि शिवने वारंवार चावी मागितली पण त्यावर रुपालीने काहीच उत्तर दिले नाही. शिव म्हणाला त्याला बाहेर काढायचे आहे, हा टास्कचा भाग नाहीये. तरीही रुपालीचे काहीच उत्तर नाही म्हणून शिवचा पारा चढला आणि तो म्हणाला इतक पण कॅप्टन बनली आहेस म्हणून वागू नको, आणि विसरू नकोस आम्ही मदत केली आहे तुला. रुपालीचे शिवला म्हणणे होते, ओरडू नकोस, ऐकल मी. त्यावर शिव म्हणाला तू कामच तशी करतेस, तुला इतकीशी पण कदर नाहीये, ओरडू नको म्हणतेस लाज वाटत असेल तर उघड ना पटकन दार. रुपालीचा आवाज चढला आणि ती म्हणाली “मला दोन मिनिट द्या.” रुपालीच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे ? ती चावी देणार का ? कि बिग बॉसच्या घोषणेची रुपाली वाट बघणार ? 
 


Web Title: Abhijit kelkar request to bigg boss for remove him from room
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.