Abhijeet kelkar got punished in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : म्हणून घरातील या सदस्याला टाकले अडगळीच्या खोलीत, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती?
बिग बॉस मराठी २ : म्हणून घरातील या सदस्याला टाकले अडगळीच्या खोलीत, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या वारंवार सूचनानंतर देखील नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते. घरामध्ये झोपणे, कुजबुज करणे, नॉमिनेशनचे प्लानिंग करणे, माईक न घालणे इत्यादी आणि आता तर घरातील कॅप्टन अभिजीत केळकरने बिग बॉसच्या महत्वाच्या नियमाचे उल्लंघन केले. अभिजीतने स्वत:लाच शिक्षा दिली. अभिजीतचे म्हणणे होते, घराचा कॅप्टन असून देखील माझ्याकडून चूक घडली. मी माईक चुकीच्या पद्धतीने घातला होता आणि यासाठी मी शिक्षा भोगली पाहिजे असे माझ्या मनामध्ये होते आणि म्हणूनच मी स्वत:ला अडगळीच्या खोलीमध्ये डांबून घेतले आणि एकदंरीतच आमच्या कडून ज्या चुका झाल्या, काही नियमांचे उल्लंघन झाले त्यामुळे तुम्ही शिधा बंद केला आणि तो पूर्ववत झाला नाही आणि त्यामुळे तो परत पूर्ववत व्हावा अशी त्याने बिग बॉसना विनंती केली.

यावर बिग बॉस यांनी घरातील सदस्यांन सांगितले, बिग बॉसच्या आदेशा शिवाय घरातील कोणत्याही सदस्याने अडगळीच्या खोलीचा वापर वैयक्तिक अथवा कोणत्याही कारणासाठी करण्यास सक्त मनाई आहे. अभिजीत घरातील कॅप्टन असून नियमभंग होणार नाही याची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे तरीदेखील तुम्हीच या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे बिग बॉस यांनी अभिजीत केळकरला पुढच्या आदेशापर्यंत अडगळीच्या खोलीमध्ये रहाण्याची शिक्षा ठोठावली.
 


Web Title: Abhijeet kelkar got punished in bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.