ठळक मुद्देआम्ही पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर आमची सुरुवातीला मैत्री झाली आणि काहीच महिन्यात मी तिच्या प्रेमात पडलो होतो. 

आस्ताद काळेचा आज म्हणजेच १६ मे ला वाढदिवस असून अग्निहोत्र, सरस्वती, पुढचे पाऊल, सरस्वती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला त्याने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे आस्ताद खऱ्या आयुष्यात कसा आहे हे त्याच्या चाहत्यांना जाणून घेता आले. तिला काही सांगायचंय या त्याच्या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

१६ मे १९८३ रोजी पुण्यात जन्मलेल्या आस्तादने खूपच कमी वयात अभिनय क्षेत्रातील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढचे पाऊल या मालिकेतील स्वप्नाली पाटीलसोबत तो नात्यात असून त्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमात प्रेमाची कबुली दिली होती. स्वप्नाली आणि आस्ताद एकमेकांचे अनेक वर्षं फ्रेंड्स आहेत. पण त्यांच्या नात्याला सुरुवात कशी झाली याविषयी विचारले असता आस्ताद सांगतो, आम्ही दोघांनी अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट केला होता. त्या कार्यक्रमात आम्ही दोघे भाऊ-बहीण होतो. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी आम्ही पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर आमची सुरुवातीला मैत्री झाली आणि काहीच महिन्यात मी तिच्या प्रेमात पडलो होतो. 

त्यांच्या प्रेमकथेविषयी स्वप्नाली सांगते, आस्तादने मला प्रपोज केले नाही. पण मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्याने मला तू आवडतेस असे सांगितले... त्यावर मला या गोष्टीचा विचार करू दे असे मी त्याला सांगितले आणि जवळजवळ वर्षभरा नंतर होकार कळवला. 

आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती. यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते. पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना त्यांना नव्हती. माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते. हा भाग आम्ही घरातील सगळे मिळून पाहात होतो. हा कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले....  


Web Title: Aastad Kale Birthday Special: Aastad Kale swapnali patil love story
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.