'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमने केली धमालमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:30 PM2018-11-02T21:30:00+5:302018-11-02T21:30:00+5:30

'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावली.

Aani ... Dr. Kishinath Ghanekar's team visited in Assal Pahune Irsal Namune show | 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमने केली धमालमस्ती

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमने केली धमालमस्ती

googlenewsNext
ठळक मुद्देसुबोध भावेला मराठी रंगभूमी व चित्रपटाचा अभिमान'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमने केली धमालमस्ती

'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये या टीमने बरीच धम्माल मस्ती केली आहे. सुबोध भावेने मराठी रंगभूमी आणि चित्रपटाचा त्याला अभिमान असल्याचे सांगितले आहे. 

सुमित राघवन आणि आनंद इंगळे यांच्यामध्ये एक खेळ खेळण्यात आला. ज्यामध्ये एक अमुक शब्द काय आहे हे अभिनयाने ओळखायचे आहे. तसेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये पुणे आणि मुंबई अश्या दोन टीम करण्यात आल्या आहेत. पुणे टीममध्ये सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि आनंद इंगळे तर मुंबई टीम मध्ये सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी असणार आहेत. त्यांना त्यांच्या शहरांनुसार माणुसकी, खवय्येगिरी, गर्दी आणि भाषा यांच्या काय व्याख्या आहेत असे विचरण्यात आले. आता यावर हे मंडळी काय उत्तर देण्यात हे बघण्यासारखे असणार आहे. तसेच त्यांचे भीती, अपमान, राग या विषयांवर त्यांना आलेले अनुभव आणि कधी न ऐकलेले किस्से देखील ऐकायला मिळणार आहेत.
तसेच सुबोध भावेला दोन सिनेमांमधून एका चित्रपटाची निवड करण्याचे मोठे आव्हान दिले होते.  'बालगंधर्व' की 'लोकमान्य – एक युग पुरुष' कोणता चित्रपट आवडीचा आहे यावर तो म्हणाला, 'बायोपिकची सुरुवात बालगंधर्व या चित्रपटापासून झाली ... म्हणून 'बालगंधर्व.'
'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'चा दिवाळी विशेष भाग “आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ५ नोव्हेंबर पासून रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

 
 

Web Title: Aani ... Dr. Kishinath Ghanekar's team visited in Assal Pahune Irsal Namune show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.