'आई कुठे काय करते' मालिकेत येणार निर्णायक वळण, अनिरुद्धला होतोय आपल्या निर्णयाचा पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:28 PM2021-04-29T17:28:31+5:302021-04-29T17:28:52+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेत नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

Aai Kuthe Kay Karte serial has new twist, new promo released on Instagram | 'आई कुठे काय करते' मालिकेत येणार निर्णायक वळण, अनिरुद्धला होतोय आपल्या निर्णयाचा पश्चाताप

'आई कुठे काय करते' मालिकेत येणार निर्णायक वळण, अनिरुद्धला होतोय आपल्या निर्णयाचा पश्चाताप

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. आता मालिकेत नवीन वळण येणार आहे. स्टार प्रवाहने आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अनिरूद्धला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचे दिसून येत आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या नव्या प्रोमोत दाखवले आहे की, अरूंधती अनिरुद्धला बोलते की तुम्हाला संजनाशी लग्न करायचे असेल तर त्यावर अनिरूद्ध तिला मी शुअर नाही आहे असे सांगतो. त्यावर अरुंधती त्याला म्हणते की तुम्हाला संजना कडे जावेच लागेल. आता तुम्ही मागे फिरूच शकत नाही आणि आता मी ते होऊ देणार नाही. त्यावर अनिरुद्ध म्हणतो की अजूनही मी परत फिरायला तयार आहे अरूंधती. पण अरूंधती त्याला आता माझा मार्ग वेगळा आहे असे सांगून निघून जाते.    


आई कुठे काय करते मालिकेत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात एकीकडे आता अभिवरचे संकट दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा ते त्याच्या आणि अनघाच्या साखरपुड्याची तयारी करण्याबद्दल बोलताना दिसत आहे. घरात पुन्हा आनंदी वातावरण असताना गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर संजना तिथे येऊन बऱ्याच उलटसुलट गोष्टी बोलून जाते. त्यामुळे पुन्हा एकदा घरात नाराजी पसरलेली दिसते आहे. संजना तिथे येऊन लग्न झाल्यावर मी या घरात येऊन राहणार असल्याचे सांगून जाते. त्यामुळे आता आगामी भागात काय घडेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte serial has new twist, new promo released on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.