'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:33 PM2021-06-16T17:33:36+5:302021-06-16T17:34:04+5:30

मिलिंद गवळी आज ५५वा वाढदिवस साजरा करतो आहे.

Aai Kuthe Kay Karte Fame Aniruddha birthday special story | 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी

'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेतील अनिरूद्ध देशमुखची ग्रे शेड भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेच्या आधी मिलिंद गवळीने मालिका आणि चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आज मिलिंदचा ५५वा वाढदिवस आहे.

 
मिलिंद गवळीने हिंदी व मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. मिलिंदचा जन्म १६ जून, १९६६ रोजी मुंबईत झाला आहे. हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात मिलिंदने बालकलाकार म्हणून काम केले होते. अभिनयासोबत मिलिंदला फोटोग्राफीची देखील आवड आहे.


मिलिंद गवळीची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. मिलिंद गवळी एकदा एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून ते जळगावला गेले होते. तिथे त्याला एक मुलगी दिसली. पहिल्याच नजरेत ती तिच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न देखील केले. ही मुलगी म्हणजे त्याची पत्नी दीपा गवळी.

त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून होकार तर होता, पण मुलाला ठोस अशी नोकरी असावी, अशी अपेक्षा दीपाच्या घरच्यांकडून होती. मिलिंद यांनी हे त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून एम.कॉमचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी रीतसर परीक्षा देऊन त्यात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे अभिनयाच्या करियरमध्ये बराच गॅप पडला. मात्र मिलिंद गवळीने पुन्हा कमबॅक केले आणि मग मागे वळून पाहिले नाही.


मिलिंद गवळी आणि दीपा गवळी यांनी एक मुलगी आहे. जिचे नाव मिथिला आहे. ती उत्तम नृत्यांगना आहे आणि नृत्यदेखील शिकवते. २०१८मध्ये तिचा विवाह झाला आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fame Aniruddha birthday special story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.