'आई कुठे काय करते' मालिकेतील आप्पांच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का?, नुकतेच झाले तिचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:00 AM2021-07-25T07:00:00+5:302021-07-25T07:00:00+5:30

आई कुठे काय करते मालिकेतील आप्पाच्या भूमिकेने अभिनेते किशोर महाबोले यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Aai Kuthe kay Karte fame Aappa Aka Kishor Mahabole's duaghter just married | 'आई कुठे काय करते' मालिकेतील आप्पांच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का?, नुकतेच झाले तिचे लग्न

'आई कुठे काय करते' मालिकेतील आप्पांच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का?, नुकतेच झाले तिचे लग्न

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. या मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या लेकीचा विवाह पार पडला. 

आई कुठे काय करते मालिकेत आप्पांची भूमिका अभिनेते किशोर महाबोले यांनी साकारली आहे. काही दिवसांपूर्वी किशोर महाबोले यांची लेक सृष्टी महाबोले हिचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले. आपल्या लेकीच्या लग्नात तिच्यासोबत काढलेला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यासोबतच चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांनी आभार देखील मानले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “माझी मुलगी चि.सौ.का. सृष्टीच्या लग्नात आपण आशीर्वाद पाठवले त्यामुळे लग्न निर्विघ्न पार पडले धन्यवाद।” 


किशोर महाबोले हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी अर्चनाच्या वडिलांची मनोहर करंजकर यांची भूमिका साकारली होती. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून फिरंगोजी यांची व्यक्तिरेखा साकारली होती. सुलतान शंभू सुभेदार, मी शिवाजी पार्क, बस्ता, कुंकू झाले वैरी, आई शप्पथ, सखी, द लेजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत. 


आई कुठे काय करते मालिकेतील आप्पाच्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्यांना सेटवर समजली. अशावेळी त्यांनी आपले काम पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य दिले. यावरून त्यांचे सहकालाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी देखील कौतुक केलेले पाहायला मिळाले होते.

Web Title: Aai Kuthe kay Karte fame Aappa Aka Kishor Mahabole's duaghter just married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.