तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:22 PM2021-02-27T12:22:15+5:302021-02-27T12:26:21+5:30

YouTube News : नव्या फीचरमुळे पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत.

youtube brings supervised account for children here is what parents need to know | तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

googlenewsNext

नवी दिल्ली - व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात असतं. याच दरम्यान युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने आता एका खास फीचरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या फीचरमुळे पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत. कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाऊंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकतील.

नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल.

1. Explore (एक्सप्लोर) 

ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.

2. Explore more (एक्सप्लोर मोअर) 

ही सेटिंग 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल.

3. Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब)

 या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ता

काही जण गुपचूप आपलं फेसबुक प्रोफाईल चेक करत असतात. त्यांच्या उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. मात्र कोणी कोणी आपलं प्रोफाईल चेक केलंय याची माहिती सहज मिळवणं शक्य आहे. यातून आपण सतर्क होऊ शकतो. फेसबुकवर युजर्सना आपलं प्रोफाईल लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण काहींना याबाबत माहिती नाही. त्यामुळे काहींना आपल्या अकाऊंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न पडतात. अशांना ही पद्धत सोयीची ठरणार आहे. कोणती व्यक्ती आपली प्रोफाईल नेहमी स्टॉक करतं. तसेच तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं अथवा कोण पाहतंय? हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते जाणून घेऊया...

सर्वात आधी Facebook.com वर जाऊन वेबवर तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन करा. यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राऊझरचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या फेसबुक पेज किंवा टाईमलाईनवर पोहोचलात की राईट क्लिक करा आणि व्ह्यू पेज सोर्सवर क्लिक करा. फेसबुक सोर्स पाहण्यासाठी राईट क्लिक करुन Page व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. पेज सोर्स ओपन झाल्यावर ‘CTRL + F’ वर टॅप करा. आता सर्च बारवर जाऊन ‘BUDDY_ID’ टाईप करा आणि एंटर बटणावर क्लिक करा. तिथे ‘BUDDY_ID’ च्या शेजारी अनेक फेसबुक प्रोफाईल आयडी पाहायला मिळतील. ‘BUDDY_ID’ च्या शेजारी एक एक 15 अंकी कोड दिसेल तो कोड कॉपी करा आणि दुसऱ्या पेजवर फेसबुक ओपन करा. नव्या टॅबवर Facebook.com/15-digit code पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करा. तुमची प्रोफाईल पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल.

Web Title: youtube brings supervised account for children here is what parents need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.