भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी 

By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2021 07:32 PM2021-06-04T19:32:41+5:302021-06-04T19:34:02+5:30

Mi 11 Lite India launch: Mi 11 Lite च्या इंडिया लाँचची माहिती हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर टीज केली आहे.

xiaomi teased mi 11 lite smartphone india launch  | भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी 

Mi 11 Lite स्मार्टफोनचा कोणता व्हेरिएंट भारतात लाँच हे अजून स्पष्ट झाले नाही. हा स्मार्टफोन 4G आणि 5G व्हेरिएंट्समध्ये सादर केला गेला आहे.

googlenewsNext

Xiaomi लवकरच भारतात नवीन Mi स्मार्टफोन लाँच करणार आहे. शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन Mi 11 Lite असू शकतो. या स्मार्टफोनच्या इंडिया लाँचची माहिती हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर टीज केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शाओमीच्या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही. परंतु, फक्त ‘Lite’ शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्यातरी फक्त अंदाज बांधले जात आहेत. तसेच, Mi 11 Lite स्मार्टफोनचा कोणता व्हेरिएंट भारतात लाँच हे अजून स्पष्ट झाले नाही. हा स्मार्टफोन 4G आणि 5G व्हेरिएंट्समध्ये सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या किंमतीत सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. 

Xiaomi Mi 11 Lite स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनचे दोन्ही 4G आणि 5G व्हेरिएंट्स 6.5-इंचाच्या FHD+ AMOLED पॅनलसह सादर केले गेले आहेत. या स्मार्टफोनच्या 4G व्हेरिएंट्सच्या डिस्प्लेमध्ये कंपनीने Corning Gorilla Glass 5 आणि 5G व्हेरिएंटमध्ये Gorilla Glass 6 ची सुरक्षा दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्ज सपोर्टसह येते. 

शाओमीच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 64MP सेंसर आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5MP मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने Xiaomi Mi 11 Lite 5G व्हेरिएंट्समध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 

Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंट्स कंपनीने Qualcomm Snapdragon 732G चिपसेटसह सादर केला आहे. तर, Xiaomi Mi 11 Lite 5G स्मार्टफोन कंपनीने Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केले गेले आहेत. AMOLED पॅनलसह शाओमीच्या या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. 

Web Title: xiaomi teased mi 11 lite smartphone india launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.