Redmi Note 6 Pro स्मार्टफोनवर मिळतोय 6,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:26 PM2018-12-26T19:26:17+5:302018-12-26T19:56:20+5:30

Redmi कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Redmi Note  6 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. मात्र आता या किंमतीत घट करण्यात आली आहे.   

xiaomi redmi note 6 pro discount flipkart sale exchange offer | Redmi Note 6 Pro स्मार्टफोनवर मिळतोय 6,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

Redmi Note 6 Pro स्मार्टफोनवर मिळतोय 6,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

Next

नवी दिल्ली : Xiaomi कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Redmi Note  6 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. मात्र आता या किंमतीत घट करण्यात आली आहे.   

Redmi Note  6 Pro स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांना मिळत आहे. मात्र, या पेक्षाही तुम्हाला स्वस्त खरेदी करायचा असेल तर Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. 

Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास दहा टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंटची मर्यादा 1,500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे Redmi Note  6 Pro स्मार्टफोन 12,499 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय एक्स्चेंज ऑफरमध्ये सुद्धा सवलत मिळवू शकता.  

Redmi Note  6 Pro  स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन...
- 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी 
-  क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर 
- 4,000mAh क्षमतेची बॅटरी
-  6.26 इंचाचा फूल एचडी स्क्रीन
- स्क्रीन टू बॉडी रेश्यो 86% 
 
 

Web Title: xiaomi redmi note 6 pro discount flipkart sale exchange offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.