टॅबलेट सेगमेंटमध्ये Xiaomi चे धमाकेदार पुनरागमन; मोठी बॅटरी आणि स्मार्ट पेन सपोर्टसह Pad 5 लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: September 16, 2021 01:02 PM2021-09-16T13:02:16+5:302021-09-16T13:05:32+5:30

Xiaomi Pad 5 Price In India: Xiaomi ने चीनमध्ये सादर केलेला टॅबलेट Xiaomi Pad 5 आता जागतिक बाजारात सादर केला आहे. यात Smart Pen, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरी असे दमदार स्पेसीफाकेशन्स देण्यात आले आहेत.  

Xiaomi pad 5 with xiaomi smart pen launched supports 8720mah battery and 13mp camera  | टॅबलेट सेगमेंटमध्ये Xiaomi चे धमाकेदार पुनरागमन; मोठी बॅटरी आणि स्मार्ट पेन सपोर्टसह Pad 5 लाँच  

टॅबलेट सेगमेंटमध्ये Xiaomi चे धमाकेदार पुनरागमन; मोठी बॅटरी आणि स्मार्ट पेन सपोर्टसह Pad 5 लाँच  

googlenewsNext
ठळक मुद्देXiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो.

Xiaomi ने काल झालेल्या आपल्या इव्हेंटच्या माध्यमातून इतर डिवाइससह Xiaomi Pad 5 देखील जागतिक बाजारात सादर केला आहे. कंपनीने तीन वर्षानंतर टॅबलेट सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. या टॅबलेटमध्ये Xiaomi Smart Pen चा सपोर्ट देण्यात आला आहे.  

Xiaomi Pad 5 ची किंमत 

Xiaomi Pad 5 चे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. यातील 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत EUR 349 (जवळपास 30,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर टॅबलेटचा 6GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट EUR 399 (जवळपास 34,600 रुपये) मध्ये विकत घेता येईल. कंपनी भारतात हा टॅबलेट लवकरच सादर करू शकते.  

Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते.  

या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो. 

Web Title: Xiaomi pad 5 with xiaomi smart pen launched supports 8720mah battery and 13mp camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.