108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: October 19, 2021 03:46 PM2021-10-19T15:46:04+5:302021-10-19T15:46:09+5:30

Upcoming 5G Phone Xiaomi 11T Pro 5G India Launch: आयएमईआय डेटाबेसवर Xiaomi 11T आणि 11T Pro 5G Phone लिस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हे फोन लवकरच भारतात सादर केले जाऊ शकतात.

Xiaomi 11T Pro 5G Phone India Launch soon know specs price sale  | 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट 

108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट 

Next

शाओमीने सप्टेंबरमध्ये Xiaomi 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G हे दोन फोन जागतिक बाजारात सादर केले होते. आता हे दोन्ही शाओमी फोन IMEI डेटाबेसमध्ये दिसले आहेत. हे भारतीय व्हेरिएंट समोर असतील, म्हणजे आता लवकरच Xiaomi 11T आणि 11T Pro 5G Phone देशात सादर केले जाऊ शकतात. ही माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे.  

हा शाओमी फोन आयएमईआय डेटाबेसवर 2017113SI मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच हा मॉडेल नंबर काही दिवसांपूर्वी BIS या भारतीय सर्टिफिकेशन साईटवर दिसेल. त्यामुळे हे फोन कंपनी लवकरच भारतीय बाजारात सादर करू शकते. हे शाओमी फोन दिवाळीच्या आसपास भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात, अशी चर्चा आहे.  

Xiaomi 11T चे स्पेसिफिकेशन्स   

Xiaomi 11T मधील डिस्प्लेवर कंपनीने खूप काम केल्याचे दिसते. यातील 6.67-इंचाचा FHD+ TrueColour डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, आयकेयर मोड, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus लेयर प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 Ultra चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 11 OS सह MIUI 12.5 कस्टम स्किनवर चालतो.   

Xiaomi 11T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची खासियत यातील 108MP चा मुख्य सेन्सर आहे. ज्याला 120-डिग्री FoV असलेल्या 8MP च्या अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 3x झूम देणाऱ्या टेली-मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी Xiaomi 11T मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स  

नावावरून समजले असेल कि Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.   

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   

Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro ची किंमत  

  • Xiaomi 11T (8GB + 128GB): Euro 549 (जवळपास 47,700 रुपये)   
  • Xiaomi 11T (8GB + 256GB): Euro 599 (जवळपास 52,000 रुपये)   
  • Xiaomi 11T Pro (8GB + 128GB): Euro 649 (जवळपास 56,400 रुपये)  
  • Xiaomi 11T Pro (8GB + 256GB): Euro 699 (जवळपास 60,800 रुपये)   
  • Xiaomi 11T Pro (12GB + 256GB): Euro 749 (जवळपास 65,100 रुपये) 

Web Title: Xiaomi 11T Pro 5G Phone India Launch soon know specs price sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.