निळं आधार कार्ड म्हणजे काय? अर्ज करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 

By सिद्धेश जाधव | Published: October 5, 2021 07:40 PM2021-10-05T19:40:56+5:302021-10-05T19:41:04+5:30

What is a Blue Aadhaar Card: निळं आधार कार्ड (Blue Aadhaar Card) बनवण्याची प्रक्रिया सामान्य आधार सारखीच आहे, परंतु याचे फायदे मात्र वेगळे आहेत.  

who gets and how to apply for Blue aadhaar card know details  | निळं आधार कार्ड म्हणजे काय? अर्ज करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 

निळं आधार कार्ड म्हणजे काय? अर्ज करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती 

googlenewsNext

भारतीयांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्वाचे ओळखपत्र आहे. यात तुमची डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहिती देखील साठवलेली असते. भारतीय नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती आधार नंबर घेऊ शकते. म्हणजे अगदी नजर शिशु देखील आधार नंबर मिळवू शकतात. लहान मुलांच्या आधार कार्डला बाल आधार (Baal Aadhaar) म्हणतात. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर बाल आधार अमान्य होते. 5 वर्षानंतर आणि 15 वर्षानंतर बायोमेट्रिक आधार डेटा अपडेट करणे आवश्यक असते. असे केल्यासच आधार कार्ड री-अ‍ॅक्टिव्हेट होईल. 

मोठयांच्या आधार कार्ड प्रमाणे बाल आधार कार्डसाठी अर्ज करता येतो. आवश्यक ती कागदपत्र घेऊन तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. एक दिवसाच्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आधार बनवताना फक्त दोन डॉक्यूमेंट्सची गरज असते. यात जन्मदाखला आणि आई-वडीलांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु बाल आधारचा रंग मात्र निळा असतो.  

5 वर्षाखालील मुलांसाठी निळं आधार कार्ड बनवण्यासाठी:   

  • सर्वप्रथम मुलांसोबत आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जा. तिथे तुम्हाला एक एक फॉर्म दिला जाईल तो भरा. 
  • सेंटरवर पालक आणि अजून एका व्यक्तीच ओळखपत्र घेऊन जावे लागेल. 
  • Baal Aadhaar वर लावण्यासाठी आधार सेंटरमध्ये मुलाचा फोटो काढला जाईल.  
  • बाल आधार एका पालकांच्या आधार कार्डशी लिंक करण्यात येईल.  
  • फिंगरप्रिंट किंवा इतर कोणतेही बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जाणार नाहीत. 
  • या आधार सोबत पालकांचा एक मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. 
  • वेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशनंतर कन्फर्मेशन नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.  
  • कन्फर्मेशन मेसेज मिळाल्याच्या 60 दिवसांमध्ये रजिस्टर्ड पत्त्यावर बाल आधार पाठवण्यात येईल.  

Web Title: who gets and how to apply for Blue aadhaar card know details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.