ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर 

By सिद्धेश जाधव | Published: October 18, 2021 01:17 PM2021-10-18T13:17:15+5:302021-10-18T13:17:43+5:30

New Vivo Phone Series Vivo T: विवो एका ब्रँड न्यू Vivo ‘T’ Series अंतर्गत 12GB RAM, 44W Fast Charging आणि Snapdragon 778G सह Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन फोन सर्वप्रथम लाँच करू शकते.

Vivo T1 and T1x launch date 19 october specs price sale detail leak  | ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर 

ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर 

googlenewsNext

विवो नव्या सीरिजवर काम करत असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही नवी-कोरी सीरिज याच आठवड्यात बाजारात येऊ शकते. आता विवो एका ब्रँड न्यू Vivo ‘T’ Series अंतर्गत नवीन स्मार्टफोन सादर करू शकते. या सीरिज अंतर्गत Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन फोन सर्वप्रथम लाँच केले जातील. विशेष म्हणजे या सीरिजसाठी जास्त दिवस वाट देखील बघावी लागणार नाही, कारण विवो टी1 सीरीज उद्याच म्हणजे 19 ऑक्टोबरला चीनमध्ये सादर केली जाईल.  

Vivo T1 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

मीडिया रिपोर्ट्सनुसार विवो टी1 मध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 900 ची प्रोसेसिंग पॉवर मिळू शकते. हा अँड्रॉइड 11 आधारित फोन 8GB RAM आणि 12GB RAM सह बाजारात येऊ शकतो. तसेच फोनचे 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध होऊ शकतात.  

Vivo T1 मधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जाऊ शकतो. हा फोन 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटरसह विकत घेता येईल. पॉवर बॅकअपसाठी विवो टी1 स्मार्टफोन 4,005एमएएचची बॅटरी असल्याची माहिती लीकमधून समोर आली आहे.  

Vivo T1x चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

विवो टी1एक्स हा फोन 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. यात कंपनी हाय रिफ्रेश रेट देऊ शकते. हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह बाजारात येईल. तसेच अँड्रॉइड 11 ओएस वर चालेल. हा फोन देखील 8GB/128GB आणि 12GB/256GB कॉन्फिगरेशनसह सादर केला जाऊ शकतो.  

Vivo T1x मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड कॅमेरा सेन्सर असेल. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर असेल. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,900एमएएचची बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकतो.  

Web Title: Vivo T1 and T1x launch date 19 october specs price sale detail leak 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.