बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Published: January 18, 2022 12:59 PM2022-01-18T12:59:47+5:302022-01-18T13:00:07+5:30

Vivo T1 5G Phone: Vivo T सीरिज भारतातील वाय सीरीजच्या स्मार्टफोन्सची जागा घेऊ शकते. यातील पहिला स्मार्टफोन मार्चमध्ये भारतात येऊ शकतो.

vivo t series launch soon india with Vivo T1 5G phone know specs  | बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  

बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  

Next

Vivo इंडिया भारतातील आपली ‘वाय’ सीरिज बंद करण्याचं निर्णय घेऊ शकते. ही कंपनीची बजेट सेगमेंटमधील सीरिज आहे. ही सीरिज येत्या मार्चपासून देशातून गायब होण्यास सुरुवात होऊ शकते. कारण तेव्हा या सीरिजला रिप्लेस करण्यासाठी विवो ‘टी’ सीरिज भारतात येईल. कंपनीनं या सीरिजचे दोन स्मार्टफोन आधीच चीनमध्ये सादर केले आहेत.  

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीनं Vivo ‘T’ Series मध्ये Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स सध्या फक्त चीनमध्ये उपलब्ध आहेत. परंतु यंदा हे हँडसेट भारतात येतील. भारतात ही स्मार्टफोन सीरीज Vivo ‘Y’ Series च्या स्मार्टफोन्सची जागा घेईल, अशी माहिती 91मोबाईल्सनं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने दिली आहे. येत्या मार्चमध्ये भारतात नवीन Vivo T1 स्मार्टफोन सादर केला जाईल, जो एक 5G Phone असेल. विवोनं मात्र याची अधिकृत माहिती दिलेली नाही.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स  

विवो टी1 5जी स्मार्टफोन 6.57 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. एक एलसीडी डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.   

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

Flipkart Sale: इतक्या स्वस्तात मिळतोय iPhone 12; फक्त काही दिवस मिळणार अशी भन्नाट ऑफर

Web Title: vivo t series launch soon india with Vivo T1 5G phone know specs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.