दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:16 PM2021-02-18T17:16:53+5:302021-02-18T17:17:37+5:30

Vivo News : फ्लॅगशीप Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

vivo might launch 11 new vivo mobiles in india by april says report | दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

Next

नवी दिल्ली - हँडसेट निर्माता कंपनी विवो (Vivo) भारतातील ग्राहकांसाठी एक दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये फ्लॅगशीप Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मायस्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, विवो पुढील महिन्यात मार्चच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आपली Vivo X60 series ला लाँच करणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला बाजारात आणू शकते. 

विवोने एक्स 60 आणि एक्स 60 प्रो स्मार्टफोनला डिसेंबरमध्ये बाजारात आले होते. तर एक्स 60 प्रो प्लस स्मार्टफोनला जानेवारीत चीनच्या मार्केटमध्ये आले होते. विवो कंपनीने आपल्या Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला Snapdragon 888 पॉवर्ड प्रोसेसर सोबत बाजारात आणलं होतं. विवोने आतापर्यंत भारतात बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सला लाँच केलं आहे. मात्र Vivo X50 Series नंतर हा पहिला प्रीमियम स्मार्टफोन्स असणार आहे. विवो एक्स 60 प्रो प्लस जबरदस्त gimbal स्टॅबलाइजेशन सोबत येतो. कॅमेरा लेन्स द्वारा जबरदस्त लाइट ट्रान्समिशनसाठी Zeiss T* कोटिंग आहे.

फोनच्या बॅक पॅनेलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. 48 मेगापिक्सलचा, Sony IMX598 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत 50 मेगापिक्सलचा Samsung GN1 कॅमेरा सेन्सर, 32 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा पेरीस्कोप सेन्सर आहे. 60 एक्स सुपर झूम सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. Vivo X60 Pro+ मध्ये 6.56 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे.

सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,200 mAh ची बॅटरी दिली आहे. 55 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉईड 11 वर आधारित OriginOS 1.0 वर काम करतो. विवो एक्स 60 सीरीज सोबत भारतात Vivo X50 Pro+ ला सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी Vivo V21 series च्या अंतर्गत विवो वी21 आणि विवो वी21 प्रो स्मार्टफोन लाँच करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जबरदस्त! Motorolaने लाँच केले दमदार स्वस्त अन् मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या Moto G30, Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाने मार्केटमध्ये आपले दोन नवीन दमदार स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 लाँच केले आहेत. सुरुवातीला कंपनीने या दोन्ही फोनला युरोपमधील काही देशात लाँच केलं आहे. तसेच भारतात लवकरच हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे. मोटो G30 ची किंमत 180 यूरो म्हणजेच जवळपास 15,900 रुपये आहे. तर मोटो G10 ची किंमत 150 यूरो म्हणजेच जवळपास 13,200 रुपये आहे. 

मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी

भारतात Micromax चा 5G फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी युजर्ससोबत असलेल्या एका व्हिडीओ सेशनमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरबड्स देखील लवकरच लाँच केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मायक्रोमॅक्सने गेल्याच वर्षी भारतीयस्मार्टफोन बाजारात पुनरागमन केलं आहे. राहुल शर्मा यांनी बंगळुरूच्या R&D सेंटरमध्ये इंजिनिअर 5G फोनसाठी खूप जास्त मेहनत करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र याच्या लाँचिंगबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. लवकरच तो लाँच केला जाईल असं म्हटलं आहे. गेल्या वर्षा शर्मा यांनी एका मॉडल संदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये 6GB रॅम, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि लिक्विड कूलिंग देण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळेच हे स्पेसिफिकेशन्स हे मायक्रोमॅक्सच्या अपकमिंग 5G फोनमध्ये दिले जाऊ शकतात. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

Web Title: vivo might launch 11 new vivo mobiles in india by april says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.