रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:10 PM2022-05-14T15:10:50+5:302022-05-14T15:11:02+5:30

वोडाफोन आयडियानं 5.92Gbps चा टॉप स्पीड पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये मिळवला आहे. कंपनीनं याआधी 4Gbps स्पीडची नोंद केली होती.

Vi 5G records top download speed of 5.92 Gbps during the ongoing trials in Pune  | रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड 

रेकॉर्ड ब्रेक 5G स्पीड! पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये ‘वी’नं  नोंदवला 5.92 जीबीपीएस डाउनलोड स्पीड 

Next

5G स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या आधी वी Vodafone Idea नं आपल्या 5G नेटवर्कची क्षमता देशाला दाखवून दिली आहे. टेलिकॉम कंपनीनं 5.92Gbps चा टॉप स्पीड पुण्यात झालेल्या चाचण्यांमध्ये मिळवला आहे. कंपनीनं याआधी 4Gbps स्पीडची नोंद केली होती. एयरटेल आणि जियोच्या 5G स्पीडपेक्षा हा वेग जास्त असला तरी कंपनीनं यात सिंगल टेस्ट डिवाइस पद्धतीचा वापर केला आहे. ज्यात अन्य डिवाइस 5G नेटवर्कपासून दूर ठेवले जातात. जास्त डिवाइस जोडल्यास हा वेग बदलू शकतो.  

‘वी’नं दावा केला आहे की हा स्पीड कंपनीनं सरकारनं चाचणीसाठी दिलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करून मिळवला आहे. या चाचण्या मिड-बँड आणि हाय-बँड (एमएमवेव्ह) 5जी ट्रायल स्पेक्ट्रम यांना एकत्र करून, स्टॅन्डअलोन आर्किटेक्चरसाठी एरिक्सन मॅसिव्ह एमआयएमओ रेडिओ, एरिक्सन क्लाऊड नेटिव्ह ड्युएल मोड 5जी कोअर आणि एनआर-डीसी (न्यू रेडिओ-ड्युएल कनेक्टिव्हिटी) सॉफ्टवेयर वापरून करण्यात येत आहेत.  

कंपनीनं सांगितलं आहे की 5जी स्टॅन्डअलोन एनआर-डीसी सॉफ्टवेयरसह वी लॅटेन्सी-सेन्सिटिव्ह आणि उच्च कामगिरी बजावणारी एआर/व्हीआर आणि 8के व्हिडिओ स्ट्रीमिंग यासारखी अ‍ॅप्लिकेशन्स देऊ शकते आणि कमर्शियल नेटवर्कवर 5जी तैनात करण्यात आल्यावर ग्राहक आणि व्यवसाउद्योगांसाठी नवनवीन युज केसेस उपलब्ध करवून देऊ शकते. 

या यशाबद्दल वीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. जगबीर सिंग म्हणाले, “5जीच्या कमी लॅटेन्सी, विश्वसनीयता आणि उच्च वेगांवर आधारित नवीन 5जी आधारित अ‍ॅप्लिकेशन्ससाठी वी आपल्या नेटवर्कच्या सातत्याने चाचण्या घेत आहे आणि ते सुसज्ज करत असल्याचे या चाचण्यांमधून दिसून येते. वेगळ्या जगात घेऊन जाईल असा मीडिया आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग अनुभव मिळवण्यासाठी उत्सुक ग्राहकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता, आम्ही प्रदर्शित केलेले 5जी स्पीड आम्हाला मोबाईल ब्रॉडबँड स्पीड्स आणि ग्राहकांच्या नेटवर्कच्या अधिक जास्त क्षमतांविषयीच्या मागण्यांसाठी सुसज्ज राहण्यात मदत करेल, कारण आम्ही भारतामध्ये 'अधिक चांगल्या भविष्यासाठी 5जी' घेऊन येण्यासाठी तयार आहोत.” 

 

Web Title: Vi 5G records top download speed of 5.92 Gbps during the ongoing trials in Pune 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.