Truecaller चा मोठा घोटाळा, युजर्समार्फत जबरदस्तीने UPI रजिस्टर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 06:00 PM2019-07-30T18:00:15+5:302019-07-30T18:05:10+5:30

ट्विटरवर तक्रार दाखल करणाऱ्या युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे.

users rushed to twitter to tweet about truecaller data breach | Truecaller चा मोठा घोटाळा, युजर्समार्फत जबरदस्तीने UPI रजिस्टर 

Truecaller चा मोठा घोटाळा, युजर्समार्फत जबरदस्तीने UPI रजिस्टर 

Next

नवी दिल्ली : ऑनलाइन डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातच आता Truecaller अॅपवरील डेटा लीक केल्याची माहिती मिळत आहे. Truecaller वापरणाऱ्या अनेक युजर्संनी ट्विटवर अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. Truecaller द्वारा कोणत्याही परवानगीशिवाय UPI रजिस्ट्रेशनसाठी स्मार्टफोनवर SMS करण्यात येत आहे.  

ट्विटरवर तक्रार दाखल करणाऱ्या युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे. ट्विटरवर एका युजर्सने लिहिले आहे की, 'सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी अँड्राईड फोन चेक केला असता Truecaller अॅप अपडेट झाले होते. तसेच, काही आणखी अॅप अपडेट झाले होते. अपडेट झाल्यानंतर लगेच अॅपने माझ्या फोनवरुन निनावी फोन नंबरला अनक्रिप्टेड SMS केला होता. त्यानंतर लगेच ICICI बँकेकडून मला SMS आला'.

युजर्सने त्यानंतर ट्विटरवर लिहिले की, 'जो मेसेज मला मिळाला. त्यामध्ये  UPI साठी आपले रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे'. ICICI बँकेत माझे कोणतेही अकाउंट नाही. मात्र, Truecaller ने आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्व्हिससाठी ICICI बँकसोबत भागिदारी केली आहे. याचाच अर्थ असा आहे की Truecaller द्वारा युजर्सच्या परवानगीशिवाय UPI रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे.

ट्विटरवर अशा घटना घडल्याचे अनेक युजर्सकडून नमूद करण्यात येत आहे. तसेच, युजर्स यासंदर्भात माहिती घेण्यासाठी NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ला टॅग करत आहेत. याशिवाय, युजर्स Truecaller  अनइंस्टॉल करण्याची चर्चा करत आहेत.

दरम्यान, TrueCaller  ने एक स्टेटमेंट जारी केले आहे. यामध्ये कंपनीने म्हटले आहे, 'TrueCaller च्या लेटेस्ट अपडेटमध्ये एक बग आढळला आहे. हा बग पेमेंट फीचरला प्रभावित करत असून स्वत:च यासाठी रजिस्टर करत आहे. हा एक बग होता आणि त्याला आम्ही डिस्कंटिन्यू केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही युजर्सला याचा त्रास होणार नाही. हा बग आम्ही लगेच फिक्स केला आहे. तसेच नवीन व्हर्जन अपडेट जारी करण्यात आले आहे. ज्या युजर्सना याचा त्रास झाला आहे. त्यांनी लगेच आपले अॅप अपडेट करावे. तसेच, युजर्स मेन्यूमध्ये जाऊन डी रजिस्टर करु शकतात.'   
 

Web Title: users rushed to twitter to tweet about truecaller data breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.