tiktok secretly spying millions iphone users caught new ios 14 feature by apple | TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा

TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा

नवी दिल्ली - शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र टिकटॉक युजर्सच्या चिंतेत वाढ करणारी माहिती आता समोर आली आहे. लाखो टिकटॉक युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. कारण हे अ‍ॅप युजर्सच्या पर्सनल डेटावर नजर ठेवत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळेच टिकटॉकच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका व्हिडीओतून ही माहिती समोर आली आहे.

अ‍ॅपलने नव्या iOS 14 चं अपडेट रिलीज केलं आहे. युजर्सचा डेटा अ‍ॅक्सेस करणाऱ्या अ‍ॅपची माहिती कंपनीचं नवं फीचर देत आहे. अ‍ॅपलच्या या नव्या फीचरमुळेच ही माहिती समोर आली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी टिकटॉकमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा TikTok लाखो iPhone युजर्सवर नजर ठेवून आहे. तसेच सातत्याने युजर्सचा क्लिपबोर्ड अ‍ॅक्सेस करतं आणि त्यांची महत्त्वाची माहिती वाचत आहे. सिक्यॉरिटी रिसर्चर्स तलाल हज बेक्री आणि टॉमी मिस्क यांनी युजर्सची माहिती काढणाऱ्या अ‍ॅप्समध्ये TikTok चाही समावेश असल्याचं म्हटलं आहे. 

अ‍ॅपलच्या iOS 14 या प्रायव्हसी फीचरमुळे TikTok असं करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हे एक असं फीचर आहे ज्यामध्ये एखादं अ‍ॅप तुमची परवानगी न घेता तुमच्या फोनमधील माहिती घेत असल्यास समजतं. युजर जे काही क्लिपबोर्डवर टाईप करत आहे ते टिकटॉक आपोआप कॉपी करत आहे. यासाठी युजर्सची कोणतीही परवानगी घेतली जात नाही हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट

CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी खास उल्लेख केलेली 'ती' व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

CoronaVirus News : पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा रंगला पण नवरदेवाच्या वडिलांना 6 लाखांचा दंड ठोठावला

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

English summary :
tiktok was secretly spying on millions of iphone users caught by new ios 14 feature by apple/

Web Title: tiktok secretly spying millions iphone users caught new ios 14 feature by apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.