Tecno नं भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन; किंमत ९ हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:29 PM2021-04-21T19:29:23+5:302021-04-21T19:31:51+5:30

काही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केला होता Tecno Spark 7 स्मार्टफोन. नाईट मोड, स्टिरिओ साऊंडसह आहेत जबरदस्त फीचर्स

Tecno launches cheap smartphone in India; Price likely to be less than Rs 9,000, see Features | Tecno नं भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन; किंमत ९ हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता, पाहा फीचर्स

Tecno नं भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन; किंमत ९ हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता, पाहा फीचर्स

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केला होता Tecno Spark 7 स्मार्टफोन.नाईट मोड, स्टिरिओ साऊंडसह आहेत जबरदस्त फीचर्स

Tecno या कंपनीनं नुकताच आपला स्मार्टफोन Tecno Spark 7 लाँच केला होता. त्यानंतर आज अचानक कंपनीनं आपला Tecno Spark 7P हा स्मार्टफोन लाँच केला. 90Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह कंपनीनं हा स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनसोबत कंपनीनं दमदार बॅटरीही दिली आहे. Tecno Spark 7P मध्ये सुपर नाईट मोड आणि डिरॉक स्टिरिओ साऊंड इफेक्टसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. 

Tecno Spark 7P ची किंमत Tecno Spark 7 च्या जवळपाच म्हणजे ९ हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Tecno Spark 7 ची किंमत 8,499 आणि 7,499 इतकी आहे. Tecno Spark 7P हा स्मार्टफोन कंपनीनं वेबसाईटवर दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.  64GB आणि 128GB व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. तर दुसरीकडे Tecno Spark 7P हा स्मार्टफोन चार कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये आल्प्स ब्लू, मॅग्नेट ब्लॅक, स्पुस ग्रीन आणि समर मोजिटो या कलर्सचा समावेश आहे. 

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Tecno Spark 7P हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 वर आधारित HiOS 7.5 वर चालतो. यामध्ये 6.8 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात MediaTek Helio G70 SoC प्रेसेसर देण्यात आला आहे. तसंच यात मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 8 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा सेन्सरही आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात 4G LTE, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो युएसबी, 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आलाय. याशिवाय मागील बाजून फिंगर प्रिन्ट सेन्सरही देण्यात आला आहे. 

Web Title: Tecno launches cheap smartphone in India; Price likely to be less than Rs 9,000, see Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.