SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 25, 2021 11:50 AM2021-10-25T11:50:09+5:302021-10-25T11:50:25+5:30

Budget Smartwatch In India Tagg Verve Plus: भारतीय ब्रँड Tagg ने एक नवीन स्मार्टवॉच 1,899 रुपयांमध्ये सादर केला आहे. कमी किंमतीत देखील या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहेत.  

Tagg verve plus smartwatch at rs 1899 launched in india with spo2 blood oxygen monitor and heart rate sensor check details  | SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच 

SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच 

googlenewsNext

आपल्या ऑडिओ प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय ब्रँड Tagg ने किफायतशीर देशात Smartwatch लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच Tagg Verve Plus नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीने ब्लॅक, गोल्ड आणि सिल्वर अशा तीन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. तसेच 16 रंगाचे स्ट्राइप देखील कंपनीने उपलब्ध करवून दिले आहेत.  

Tagg Smartwatch Price In India 

Tagg Verve Plus ची किंमत कंपनीने 1,899 रुपये ठेवली आहे. हा वॉच ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.  

Tagg Verve Plus चे स्पेसिफिकेशन्स 

Tagg Verve Plus मध्ये 1.69 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 240 x 280 पिक्सल रिजोल्यूशन आणि 500 निट्स ब्राईटनेस मिळते. हा स्मार्टवॉच IP68 वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टवॉच पाणी आणि धुळीपासून वाचू शकतो. या डिवाइसचे वजन फक्त 27 ग्राम आहे.  

यात Cycling, Skipping, Swimming, Badminton, Table Tennis, Tennis, Hiking, Walking, Basketball, Football, Dancing, Yoga, Sit Up, Indoor Running, Outdoor Running असे 16 स्पोर्ट्स मोड सपोर्ट देण्यात आला आहे. यात हेल्थ ट्रॅकिंग फीचर फीचर्सचा समावेश देखील करण्यात आला आहे. ज्यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ब्लड-ऑक्सीजन लेव्हल ट्रॅकर, फीमेल हेल्थ ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर इत्यादींचा समवेश आहे.  

सिंगल चार्जवर हा स्मार्टवॉच 10 दिवस चालू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. हा वॉच स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यावर नोटिफिकेशन अलर्ट, इनकमिंग कॉल, मेसेज अलर्ट देखील मिळवता येतील. तसेच यातील रिमोट कॅमेरा ऑपरेटिंग फीचरच्या मदतीने तुम्ही फोन दूर वर ठेऊन देखील फोटो कॅप्चर करू शकता.  

Web Title: Tagg verve plus smartwatch at rs 1899 launched in india with spo2 blood oxygen monitor and heart rate sensor check details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.