व्हॉट अ‍ॅन आयडिया; शर्टावरच लावा एसी अन् दिवसभर राहा थंड थंड कूल कूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:50 PM2019-07-25T14:50:52+5:302019-07-25T15:05:26+5:30

उकाड्यापासून आता सुटका होणार आहे कारण शर्टवर सहजपणे लावता येईल असं छोटं उपकरण बाजारात आलं आहे.

sony developed ac smaller than mobile phone | व्हॉट अ‍ॅन आयडिया; शर्टावरच लावा एसी अन् दिवसभर राहा थंड थंड कूल कूल!

व्हॉट अ‍ॅन आयडिया; शर्टावरच लावा एसी अन् दिवसभर राहा थंड थंड कूल कूल!

Next
ठळक मुद्देजपानची लोकप्रिय कंपनी सोनीने एक खास एयर कंडीशनर (AC) उपकरण बाजारात आणले आहे. रिऑन पॉकेट (Reon Pocket) असं सोनीच्या या एअर कंडीशनरचं नाव आहे.सोनीने या एयर कंडीशनरला क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं आहे. शर्टाच्या मागे हे उपकरण लावता येणार आहे.

नवी दिल्ली - वातावरणात सतत बदल होत असतात. कधी माणसं उकाड्याने हैराण होतात तर कधी खूप थंडी वाजते. सातत्याने हवामान बदलांमुळे अनेकदा आजारी पडण्याचा देखील धोका असतो. मात्र उकाड्यापासून आता सुटका होणार आहे कारण शर्टवर सहजपणे लावता येईल असं छोटं उपकरण बाजारात आलं आहे. जपानची लोकप्रिय कंपनी सोनी (Sony) ने एक खास एयर कंडीशनर (AC) उपकरण बाजारात आणले आहे. 

रिऑन पॉकेट (Reon Pocket) असं सोनीच्या या एअर कंडीशनरचं नाव आहे. या उपकरणाचं वैशिष्टय म्हणजे हे उन्हाळ्यात म्हणजे जास्त गरम होत असताना थंड ठेवणार आहे. तर थंडीच्या दिवसात गरम हवा देणार आहे. हे एसी उपकरण मोबाईलपेक्षा लहान असल्याने सहजपणे कपड्यांवर फिट करता येणार आहे. स्मार्टफोनच्या मदतीने हे कंट्रोल करता येणार आहे. रिऑन पॉकेट वापरण्यास अगदी सोपं असून ते कपड्यांमध्ये नीट फिट करून कूल राहता येतं. 

सोनीने या एयर कंडीशनरला क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं आहे. शर्टाच्या मागे हे उपकरण लावता येणार आहे. हे एअर कंडीशनर एका खास प्रकारच्या इनरवेअरसोबतही परिधान करता येतं. सोनीच्या या उपकरणाचं तापमान मोबाईलमधील अ‍ॅपच्या मदतीने कमी जास्त करता येणार आहे. एका विशिष्ट एसी पेल्टियर घटकापासून हे उपकरण तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे रिऑन पॉकेट लगेच थंड आणि गरम होण्यास मदत होते. या घटकाचा वापर कार किंवा कुलर्समध्ये केला जातो. 

रिऑन पॉकेटसोबत येणारे इनरवेअर हे स्मॉल, मीडियम आणि लार्ज साइजमध्ये उपलब्ध आहे. सध्या हे उपकरण फक्त पुरूषांसाठीच उपलब्ध आहे. इनरवेअरमध्ये एक छोटं पॉकेट असणार आहे. यामध्ये एसी उपकरण आरामात ठेवता येणार आहे. स्मार्ट उपकरणात लिथियम ऑयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. अवघ्या 2 तासांत ते चार्ज करता येणार आहे. चार्ज केल्यानंतर दिवसभर याचा वापर करण्यात येणार आहे. एअर कंडीशनर ब्लूटूथ 5.0 LE कनेक्टेड फोनला सपोर्ट करतो. सोनीच्या या रिऑन पॉकेटची किंमत ही जवळपास जवळपास 9000 रुपये आहे.  
 

Web Title: sony developed ac smaller than mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.