सोनीचा जबरदस्त 4K टीव्ही झाला भारतात लाँच; जाणून 65 इंचाच्या Sony Bravia XR A80J OLED 4K ची किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:02 PM2021-06-18T19:02:36+5:302021-06-18T19:03:23+5:30

Sony Bravia TV launch: Sony Bravia XR A80J OLED TV मध्ये HDMI 2.0 पोर्ट, Dolby Vision असे फीचर्स आहेत.  

sony bravia xr a80j oled 4k tv launched in india | सोनीचा जबरदस्त 4K टीव्ही झाला भारतात लाँच; जाणून 65 इंचाच्या Sony Bravia XR A80J OLED 4K ची किंमत 

सोनीचा जबरदस्त 4K टीव्ही झाला भारतात लाँच; जाणून 65 इंचाच्या Sony Bravia XR A80J OLED 4K ची किंमत 

googlenewsNext

सोनी कंपनीने आज भारतात Sony Bravia XR A80J OLED टीव्ही लाँच केली आहे. या टीव्हीचा 65 इंचाचा मॉडेल देशात सादर करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या व्यूविंग अनुभवासाठी Cognitive Processor XR आणि चांगल्या ऑडियो क्वालिटीसाठी Sound-from-Picture Reality सपोर्ट देण्यात आला आहे. 4k 120fps व्हिडीओला सपोर्ट करणाऱ्या या टीव्हीमध्ये गेमिंग मोड देखील देण्यात आला आहे.  

Sony Bravia XR A80J OLED TV ची किंमत  

Sony Bravia XR A80J ओलेड टीव्हीच्या XR-65A80J मॉडेलची किंमत 2,99,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हि 65 इंचाची 4के टीव्ही आहे. Sony सेंटर आउटलेट, इलेक्ट्रोनिक्स स्टोर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हि टीव्ही उपलब्ध होईल.  

Sony Bravia XR A80J OLED TV चे स्पेसिफिकेशन्स  

Sony Bravia XR A80J OLED TV च्या दोन्ही बाजूंना पातळ तर वरच्या आणि खालच्या बाजूला थोडे रुंद बेजल्स मिळता. टीव्हीमध्ये जास्त डेप्थ आणि टेक्सचर देण्यासाठी XR OLED कॉन्ट्रास्ट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक रंगांसाठी ह्यूमन इंटेलिजन्ससह 3D कलर डेप्थची निर्मिती करणारा XR Triluminos Pro देखील देण्यात आला आहे. तसेच वेगवान सीन्स ब्लर होऊ नये म्हणून यात XR Motion Clarity टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.  

चांगल्या ऑडिओ क्वालिटी आणि व्हिज्युअल एक्सपीरियन्ससाठी Sony Bravia XR A80J OLED TV मध्ये डॉल्बी विजन आणि डॉल्बी अटॉमस टक्नोलॉजी देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट, अ‍ॅलेक्सा आणि अ‍ॅप्पल एयरप्ले 2 चा सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये HDMI 2.1 पोर्ट देण्यात आला आहे.  

Web Title: sony bravia xr a80j oled 4k tv launched in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.