Samsung's Galaxy Tab A (2018) model announced | सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) मॉडेलची घोषणा
सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) मॉडेलची घोषणा

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) या टॅबलेटचे अनावरण केले असून यात जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी नोट ९ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनच्या आधीच बाजारपेठेत दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. यात गॅलेक्सी टॅब ए आणि गॅलेक्सी टॅब एस ४ या मॉडेल्सचा समावेश आहे. यातील टॅब एस ४ हे टु-इन-वन म्हणजेच टॅबलेट आणि लॅपटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणारे असले तरी टॅब ए (२०१८) हे मात्र फक्त टॅबलेट म्हणूनच वापरता येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती असणार आहे. याला वाय-फाय आणि एलटीई या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्रे या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये याला २४ ऑगस्टपासून अमेरिकेत उपलब्ध करण्यात येत असून लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये याला लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

सॅमसंजच्या गॅलेक्सी टॅब ए या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १२०० पिक्सल्स क्षमतेचा, १६:१० अस्पेक्ट रेशो असणारा व टिएफटी एलसीडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी असून स्टोअरेज ३२ जीबी इतके आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ४०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.  हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यात यात ७,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस या प्रणालीने सज्ज असणारे चार स्पीकर्स असून याच्या मदतीने सुश्राव्य संगीताचा आनंद लुटता येणार आहे. यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, युएसबी टाईप-सी आदी पर्याय दिलेले आहेत. तर अ‍ॅक्सलेरोमीटर, कंपास, गायरोस्कोप, आरजीबी हॉल सेन्सर आदी विविध सेन्सर्सदेखील यामध्ये दिलेले आहेत.


Web Title: Samsung's Galaxy Tab A (2018) model announced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.