सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 04:31 PM2021-06-19T16:31:43+5:302021-06-19T16:32:41+5:30

Samsung summer days offers: सॅमसंगने समर डेजची सुरुवात केली आहे, याअंतर्गत देण्यात येणाऱ्या ऑफर्सचा फायदा 30 जूनपर्यंत घेता येईल.  

Samsung announces offers on smart tvs refrigerators ovens under samsung summer days   | सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक  

सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक  

Next

सॅमसंगनेसॅमसंग समर डेज’ ची सुरुवात केली आहे. हा सेल आजपासून म्हणजे 19 पासून सुरु होईल. गृहपयोगी वस्तूंवरील या डील्स 30 जूनपर्यंत वैध असतील. यासाठी कंपनीने एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बरोडा, ऍक्सिस, फेडरल आणि एसबीआय अश्या मोठमोठ्या बँकांशी भागेदारी केली आहे. या भागेदारीमुळे ग्राहकांना 20% पर्यंतचा कॅशबॅक देण्यात येईल.  

सॅमसंग टीव्ही  
काही निवडक टीव्ही मॉडेल्ससोबत सॅमसंग साऊंडबार मोफत देत आहे. समर डेज ऑफरमध्ये 75 इंच किंवा त्यापेक्षा मोठा QLED TV घेणाऱ्या ग्राहकांना टीव्हीच्या किंमतीनुसार 99,990 रुपयांचा Soundbar Q900T किंवा 48,990 रुपयांचा Soundbar Q800T मोफत मिळेल.  

सॅमसंगच्या QLED TV च्या 65 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या मॉडेलवर तसेच UHD TV च्या 75 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या मॉडेलसोबत 16,490 रुपयांचा Soundbar T450 मोफत देण्यात येईल. तर, QLED TV च्या 55 इंचापेक्षा मोठ्या आणि QLED TV च्या 65 इंचापेक्षा मोठ्या मॉडेल्सच्या खरेदीवर 13,490 रुपये किंमतीचा Soundbar T420 मोफत देण्यात येईल.  

तसेच या ऑफरअंतर्गत 20% टक्के कॅशबॅक (20,000 रुपयांपर्यत) देण्यात येईल. लो कॉस्ट ईएमआय आणि एक्सटेंडेड वॉरंटी अश्या सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येतील.  

सॅमसंग ऑडिओ डिवाइसेस  
सॅमसंग साऊंडबार्सच्या खरेदीवर कंपनी 10% टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक देत आहे, हा कॅशबॅक 6,000 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.  

सॅमसंग फ्रिजवरील ऑफर्स  
सॅमसंग Side-by-Side, Curd Maestro, Frost Free आणि Direct Cool रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर 15% पर्यंतचा कॅशबॅक देण्यात येत आहे. तसेच सॅमसंग फ्रिजचा लो कॉस्ट ईएमआय 990 रुपयांपासून सुरु होतो. तसेच फ्रिजमधील डिजिटल कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी देण्यात येईल.  

मायक्रोवेव्ह ओव्हन  
सॅमसंगचे मायक्रोवेव्ह ओव्हन सॅमसंग समर डेजमध्ये विकत घेतल्यास तुम्हाला 10% पर्यंतचा कॅशबॅक आणि दोन Borosil सेट मोफत मिळतील. या ओव्हन्समधील Magnetron ओव्हन्ससोबत 5 वर्षांची वाढीव वॉरंटी मिळेल. तर, ceramic enamel cavity सोबत 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.  

Web Title: Samsung announces offers on smart tvs refrigerators ovens under samsung summer days  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग