robocall like apps truecaller trapcall hiya are sending users personal data to third party | TrueCaller सारखे अ‍ॅप्स चोरतात डेटा, युजर्सची सुरक्षितता धोक्यात 
TrueCaller सारखे अ‍ॅप्स चोरतात डेटा, युजर्सची सुरक्षितता धोक्यात 

ठळक मुद्देफोन नेमका कोठून आला आहे हे समजावा म्हणून TrueCaller किंवा TrapCall सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. अ‍ॅप्समुळे आता युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे.अ‍ॅप्स युजर्सच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावरही युजर्स सातत्याने अपडेट देत असतात. मात्र या दरम्यान युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकदा कामानिमित्त वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत असतात. फोन नेमका कोठून आला आहे हे समजावा म्हणून TrueCaller किंवा TrapCall सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. युजर्सच्या फोनमध्ये यासारखे अ‍ॅप्स हमखास असतात. मात्र या अ‍ॅप्समुळे आता युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हे अ‍ॅप युजर्सचा डेटा चोरत असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,अ‍ॅप्सपासून युजर्सच्या सुरक्षिततेला धोका आहे. NCC ग्रुप या सायबर सिक्युरिटी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. काही अ‍ॅप्सचं परिक्षण केलं. यामध्ये TrapCall, TrueCaller आणि Hiya या अ‍ॅपचा समावेश होता. हे अ‍ॅप्स युजर्सच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. युजर्सच्या परवानगी शिवाय हे अ‍ॅप त्यांचा खासगी डेटा थर्ड पार्टी अ‍ॅनलिटिक्स कंपनी अ‍ॅप्सला पाठवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत. स्मार्टफोनचा वापर हा दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केले जातो. ऑनलाईन बिल भरणं अथवा इतर काही कारणास्तव अनेक अ‍ॅप्स युजर्स फोनमध्ये इन्स्टॉल करत असतात.अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना अ‍ॅप्स युजर्सकडे काही परमिशन मागतात. त्यानुसार युजर्स देखील कसलाही विचार न करता प्रत्येक गोष्टीसाठी ओकेवर क्लिक करतात. मात्र असं करणं युजर्सना महागात पडू शकतं. यामुळे युजर्सचा खासगी डेटा चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते. युजर्सचा खासगी डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स फेसबुकसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात. युजर्सच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारे होम पेजवर जाहिराती दाखवतात. जेणेकरून युजर्स त्या जाहिरातींकडे आकर्षित होऊन त्यावर क्लिक करतील. सर्च इंजिन गुगलने अपडेटेड प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पॉलिसीची घोषणा केली आहे. गुगल लवकरच अँड्रॉइडचं अपडेटेड व्हर्जन अँड्रॉइड Q लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राखण्यास मदत होणार आहे. 

आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे महत्त्वाची खासगी माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गुगल अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.  

 

Web Title: robocall like apps truecaller trapcall hiya are sending users personal data to third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.