Jio चा शानदार प्लॅन, कमी किमतीत दररोज 1.5GB डेटा आणि बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:37 PM2021-12-27T13:37:16+5:302021-12-27T13:45:26+5:30

Jio : जिओचा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅन आहे.

Reliance jio rs 239 plan vs vodafone idea RS 299 plan check which prepaid plan is best for you | Jio चा शानदार प्लॅन, कमी किमतीत दररोज 1.5GB डेटा आणि बरंच काही...

Jio चा शानदार प्लॅन, कमी किमतीत दररोज 1.5GB डेटा आणि बरंच काही...

Next

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. अशा स्थितीत कोणता प्लॅन उत्तम आहे, याबाबत युजर्स संभ्रमात आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅननबद्दल सांगणार आहोत. जिओचा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅन आहे. जिओ कमी किमतीत अधिक फायदे देत आहे. 

व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाच्या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, युजर्संना दररोज 1.5GB डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच, यामध्ये सर्व Vi Hero Unlimited बेनिफिट्स यांचा समावेश आहे. या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या ऑफरचा समावेश आहे. तसेच,  Binge All Night ऑफरसह, युजर्स दररोज 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित डेटा वापरू शकतात. प्लॅन Vi Movies आणि TV Classic च्या ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांसह देखील येतो. दरम्यान, कंपनीने किंमत वाढण्यापूर्वी, या प्लॅनची ​​किंमत 249 होती.

जिओचा 239 रुपयांचा प्लॅन
जिओचा सुद्धा असाच प्लॅन आहे, परंतु जास्त बेनिफिट्ससह किंमत खूपच कमी आहे. जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये यूजरला दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 42GB डेटा. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा एक्सेस मिळतो.

एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅनही आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे आणि दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस युजर्सला मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल इडिशनचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

दरम्यान, जर तुम्ही तिन्ही प्लॅन पाहिले तर, जिओ सर्वोत्तम असल्याचे दिसून येते, कारण जिओ कमी किमतीत अधिक लाभ देत आहे.

Web Title: Reliance jio rs 239 plan vs vodafone idea RS 299 plan check which prepaid plan is best for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.