Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर  

By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 02:43 PM2021-07-20T14:43:49+5:302021-07-20T14:44:50+5:30

Redmi Note 105G India launch: Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India च्या माध्यमातून खरेदी करता येईल.  

Redmi note 10t 5g launch in india price specification sale amazon india  | Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर  

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.

googlenewsNext

गेल्यावर्षीच्या सुरुवातीपासून भारतात 5G स्मार्टफोन लाँच होण्यास सुरुवात झाली आहे. या ट्रेंडमध्ये सर्व कंपन्यांनी आपले 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. शाओमीने देखील भारतात काही 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. परंतु स्वस्तात चांगले फीचर्स देणाऱ्या या कंपनीने कमी किंमतीतील 5G स्मार्टफोन अजूनपर्यंत भारतात लाँच केला नव्हता. Xiaomi ने आज भारतात Redmi ब्रँड अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन Redmi Note 10T 5G लाँच केला आहे. हा रेडमी नोट सीरीजचा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे. (Redmi Note 10T 5G launched in India with Dimensity 700 SoC and 90Hz LCD screen) 

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 

5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे.  

Redmi Note 10 5G ची किंमत आणि उपलब्धता 

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. Redmi Note 10T 5G स्मार्टफोन 26 जुलैपासून मी.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.  

Web Title: Redmi note 10t 5g launch in india price specification sale amazon india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.