5,000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Realme Narzo 30 4G; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2021 03:00 PM2021-06-24T15:00:56+5:302021-06-24T15:02:46+5:30

Realme Narzo 30 4G Price: Realme Narzo 30 4G ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होते, हा फोन 29 जूनपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Realme Narzo 30 4g launched in india with 5000mah battery check price and specifications   | 5,000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Realme Narzo 30 4G; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Realme Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे.

Next

कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस Realme ने भारतात आपली Narzo 30 सीरीज लाँच केली. कंपनीने या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यांची Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G अशी आहेत. यातील Realme Narzo 30 4G ची माहिती आपण या लेखात बघणार आहोत. Realme Narzo 30 5G बाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.  

Realme Narzo 30 4G ची डिजाइन  

Realme Narzo 30 4G मध्ये पंच हॉल कॅमेरा कटआउट देण्यात आली आहे. फोनच्या मागे व्हर्टिकल कॅमेरा सेटअप मिळतो. उजवीकडे पावर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. बॅक पॅनलवर रेसिंग डिजाइन पॅटर्नमध्ये रियलमी नारजोचा लोगो देण्यात आला आहे. 

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 30 4G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 FHD+, आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G95 चिपसेट मिळतो. Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB आणि 6GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. या फोनमध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे. 

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 30 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Narzo 30 4G 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Realme Narzo 30 4G ची किंमत 

Realme Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. यातील छोट्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये तर मोठा व्हेरिएंट 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

Realme Narzo 30 4G स्मार्टफोन 29 जूनपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवरून विकत घेता येईल. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 

Web Title: Realme Narzo 30 4g launched in india with 5000mah battery check price and specifications  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.