पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Published: May 19, 2022 07:07 PM2022-05-19T19:07:13+5:302022-05-19T19:08:09+5:30

Realme GT Neo 3T स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो, ज्यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळू शकतो.  

Realme GT Neo 3T India Launch Tipped To Next Month   | पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा  

पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा  

googlenewsNext

रियलमी एकामागून एक दमदार स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं आपली ‘जीटी’ सीरिज फ्लॅगशिप ग्रेड चिपसेटसह येणाऱ्या स्मार्टफोन्ससाठी राखीव ठेवली आहे. या सीरिजमध्ये आता Realme GT Neo 3T स्मार्टफोनची भर पडू शकते. हा हँडसेट भारतात येणार असल्याची माहिती टिपस्टर Abhishek Yadav नं दिली आहे. आगामी Realme GT Neo 3T फोन जून, 2022 मध्ये भारतात येऊ शकतो.  

टिपस्टरनुसार हा हँडसेट Realme Q5 Pro चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. जो याआधी चीनमध्ये आला आहे. हा हँडसेट आता Geekbench वर देखील दिसला आहे. जिथून फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

Realme GT Neo 3T मधील संभाव्य स्पेक्स 

Realme GT Neo 3T स्मार्टफोन NTBC, BIS आणि 3C सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात हा हँडसेट भारतात सादर केला जाऊ शकतो. यात 6.62 इंचाचा Full HD+ E4 AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 12GB RAM चे पर्याय मिळू शकतात सोबत 128GB आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.   

फोन Android 12 बेस्ड Realme UI 3.0 वर चालू शकतो. हँडसेट 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.  

Web Title: Realme GT Neo 3T India Launch Tipped To Next Month  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.