पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 05:59 PM2021-09-22T17:59:22+5:302021-09-22T18:00:35+5:30

Realme GT Neo2 Price: Realme GT Neo2 स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 या 5G चिपसेटकडून  प्रोसेसिंग पॉवर मिळते. तसेच यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.  

Realme GT Neo 2 Officially launched feature specs price sale offer  | पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

Next

Realme ने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Realme GT Neo2 सादर केला आहे. सध्या चीनमध्ये सादर झालेला हा फोन लवकरच जागतिक बाजारात देखील लाँच केला जाऊ शकतो. या दमदार फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या 800 सीरिजच्या प्रोसेसरचा वापर केला आहे. तसेच यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.  

Realme GT Neo2 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Neo2 चा डिस्प्ले खूप खास स्पेसिफिकेशन्ससह सादर केला आहे. कंपनीने यात Samsung E4 Display वापरला आहे, जो पंच होल आणि पूर्णपणे बेजललेस डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.  

Realme GT Neo2 स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 या 5G चिपसेटकडून  प्रोसेसिंग पॉवर मिळते. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो.  या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8 MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.   

Realme GT Neo2 ची किंमत  

  • 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,499 (सुमारे 28,500 रुपये)  
  • 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,699 (सुमारे 30,700 रुपये)  
  • 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,999 (सुमारे 34,200 रुपये)  

Web Title: Realme GT Neo 2 Officially launched feature specs price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app